Dr. Sadanand More : राजकारण हे सत्तेचे नाही तर सेवेचे साधन; डॉ. सदानंद मोरेंचे पुण्यात भाष्य

Dr. Sadanand More : राजकारण हे सत्तेचे नाही तर सेवेचे साधन; डॉ. सदानंद मोरेंचे पुण्यात भाष्य

पुणे : नामदेव मोहोळ विद्या व क्रिडा प्रतिष्ठान व मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ पुणे आयोजित मामासाहेब मोहोळ यांची जयंती व माजी खासदार अशोक मोहोळ यांचे सहस्रचंद्र दर्शन व मिरा मोहोळ यांचा अमृतमहोत्सव शिला मोहोळ यांचा विशेष सत्कार सोहळा वारजे याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी सध्याच्या राजकारणावर आपली खंत बोलून दाखवली. त्यांनी राजकारण हे सत्तेचे साधन नसून सेवेचे साधन आहे. (Dr Sadanand More Politics is not a tool of power but of service Pune)

वारजे येथील कार्यक्रमात बोलताना डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, राजकारण हे सत्तेचे साधन नसून राजकारण हे सेवेचे साधन आहे. पूर्वी 25 टक्के राजकारण आणि 75 टक्के समाजकारण होत होते. आता मात्र त्याच्या उलटे झाले आहे. 75 टक्के राजकारण आणि 25 टक्के किंबहुना 25 टक्यांच्या खाली समाजकारण गेले आहे. अशी खंत बोलतानाच डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, पूर्वी मुळशी तालुक्याला नेतृत्व नव्हते. पुण्याच्या काही मंडळींनी मुळशी तालुक्याचे नेतृत्व केले. मामासाहेब मोहोळ यांच्यामुळे मुळशी तालुक्याला नेतृत्व मिळाले आणि त्यांच्या पिढीने ते चालविले.

हेही वाचा – Nashik Crime : 108 बोकडांचा बळी, पार्टी आली अंगलट; आयकरच्या छाप्यात 850 कोटींचं घबाड सापडलं

माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, महाराष्ट्राने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले आहे. मात्र आताचे राजकारण पाहून मनाला वाईट वाटते. पण देशाला पुढे न्यायचे असेल तर महाराष्ट्राचे राजकारण बदलले पाहिजे. कारण लोकप्रतिनिधी व प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत, असेही अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटले.

माजी खासदार अशोक मोहोळ म्हणाले की, पूर्वीची राजकारणी पिढी ही वेगळी होती. आताचे राजकारण कोणत्या थराला चालले आहे. कोण कोणाला कसही बोलत आहे. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडलो. आता समाधानी आहे, असे मत अशोक मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केले. तर माजी खासदार नाना नवले म्हणाले की, मामासाहेब मोहोळ यांच्यामुळे मुळशी तालुका बदलला आहे. आता मुळशीत मतदार संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे मुळशी मतदार संघ निर्माण करून घ्यावा, असे आवाहन नाना नवले यांनी मुळशीतील आताच्या राजकारणी लोकांना केले.

हेही वाचा – Uddhav Thackeray : रामराज्याचा आरंभ भाजपाच्या आमदाराने कल्याणमध्ये केला; ठाकरेंचा हल्लाबोल

यावेळी माजी खासदार नाना नवले, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक सदानंद मोरे, ज्येष्ठ साहित्यिक अश्विनी धोंगडे, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, माजी आमदार कुमार गोसावी, मिरा मोहोळ, शिला मोहोळ, सुनिल चांदेरे, प्रविण शिंदे, रोहिदास मोरे, रामभाऊ ठोबरे, आत्माराम कलाटे, विजय कोलते, शरद ढमाले, भगवान पासलकर, संग्राम मोहोळ, कुणाल मोहोळ व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात दिलीप निकम यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. तर संजय भामरे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच बाळासाहेब गांजवे उपस्थित्यांचे आभार यांनी मानले.

First Published on: February 5, 2024 6:03 PM
Exit mobile version