घरक्राइमNashik Crime : 108 बोकडांचा बळी, पार्टी आली अंगलट; आयकरच्या छाप्यात 850...

Nashik Crime : 108 बोकडांचा बळी, पार्टी आली अंगलट; आयकरच्या छाप्यात 850 कोटींचं घबाड सापडलं

Subscribe

नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकाच्या सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हस्तगत करण्यात आले आहे. नाशिकमधील आयकर विभागाच्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाईआधी झालेल्या एका मोठ्या पार्टीची चर्चा शहरात होताना दिसत आहे. (Nashik Crime 108 Bucks Killed Party Aali Anglat 850 crore evasion was found in the income tax raid)

हेही वाचा – Uddhav Thackeray : रामराज्याचा आरंभ भाजपाच्या आमदाराने कल्याणमध्ये केला; ठाकरेंचा हल्लाबोल

- Advertisement -

संबंधित कंत्राटदाराने गेल्या महिन्यात शहरातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रशस्त अशा मोठ्या डोममध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमामध्ये 108 बोकडांचा बळी देऊन भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाची शहरभर चर्चा झाली आणि ती प्राप्तिकर विभागाकडेही पोहोचली. त्यानंतर नाशिक शहरांमध्ये प्राप्तिकर विभागाने छापे टाकून कारवाई केल्याची चर्चा आहे.

प्राप्तिकर विभागाच्या 200 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत नाशिकमधील 8 शासकीय कंत्राटदारांच्या घर व कार्यालयांवर छापे टाकले. यात सुमारे 850 कोटींहून अधिक बेहिशेबी व्यवहाराची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सरकारी व खासगी बँकांच्या लॉकर्समध्ये 6 कोटी व इतरत्र दोन कोटींची रोकड, 3 कोटींचे दागिने, सोन्याची बिस्किटे सापडली आहेत. विशेष म्हणजे कंत्राटदारांनी व्यवहारांची कागदपत्रे कर्मचारी, नातलगांच्या घरी लपवल्याचेही तपासात उघड झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Nashik Loksabha: नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा? ठाकरे-पवार आमनेसामने

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदाराच्या घरी लगीनघाई आहे. त्यामुळे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतरच प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे, पेन ड्राइव्ह तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय संबंधित व्यवसायांची खाती, संगणक, व्यवहार यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच काही कंत्राटदार कर्मचाऱ्यांच्या घरी, तर काहींच्या गाडीमधून रोकड जप्त जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या कंत्राटदारावर छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -