घरराजकारणUddhav Thackeray : रामराज्याचा आरंभ भाजपाच्या आमदाराने कल्याणमध्ये केला; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : रामराज्याचा आरंभ भाजपाच्या आमदाराने कल्याणमध्ये केला; ठाकरेंचा हल्लाबोल

Subscribe

राजापूर : आगामी लोकसभा, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कोकण दौऱ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यांनी आज राजापूर येथील सभेत उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. रामराज्याचा आरंभ भाजपाच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला, अशा शब्दात त्यांनी टीकास्र सोडले. (Ram Rajya started by BJP MLA in Kalyan Attack of Uddhav Thackeray)

हेही वाचा –  Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावल्याने उद्धव ठाकरे संतापले; सुनावले खडेबोल

- Advertisement -

जनसंवाद यात्रेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एका माजी आमदाराने पोस्टर्स लावले की, संकल्पपूर्तीचा आनंद आणि रामराज्याचा आरंभ. हेच परवा भाजपाच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवलं. पण यांचं हे रामराज्य नाही तर मरा राज्य आहे. भर पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचा आमदार जाऊन गोळीबार करतो आहे. त्याला का करावा लागला असेल गोळीबार? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार नुसते कमळाबाईपुढे हे असे हतबलं झालेले नाही तर संपले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्याचं नाव झालेलं आहे. मी त्यांना किती नाव ठेऊ जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, बाहेरची जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, जुगारी जनता पार्टी कारण यांचं रामराज्य जुगार खेळत आहेत आणि ती बातमी ते मारून टाकत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : बाळराजांच्या वाढदिवसाला गुंडांची फौज, राऊतांनी साधला श्रीकांत शिंदेंवर निशाणा

देवेंद्र फडणवीस लापता

जर एखाद्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या कानफटात मारली असती तर यांनी थयथयाट केला असता? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अकांडतांडव केला असता. गुंडगिरी कशी चालली आहे हे बघा? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला असतानाही देवेंद्र फडणवीस आज कुठे आहेत याची कल्पना नाही. लापता आहेत असं आज मी ऐकलं. कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला. त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या आमदारावर अशी वेळ का आली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

भारतीय जनता पक्ष शिल्लक आहे कुठे?

उल्हासनगर प्रकरणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी त्या गणपत गायकवाड यांची बाजू घेत नाही. पण त्या गायकवाड यांचे वक्तव्य आहे की, त्यांच्या मुलाला भर पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाली म्हणून एक बाप म्हणून ज्यांनी धक्काबुक्की केली त्यांना गोळ्या घातल्या. तसेच मला पश्चाताप होत नाही, असेही त्यांनी म्हटले. जर तुमच्या आमदाराच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की झाली, तर पोलीस का काही करत नाही? यातून हेच लक्षात येतं की, भारतीय जनता पक्ष शिल्लक आहे कुठे? असाही प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Mumbai Crime : चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; शाळेतील सुरक्षा रक्षकाला अटक

पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही

उद्धव ठाकरे म्हणाले की, जोपर्यंत संधी मिळाली आहे तोपर्यंत गोडीगुलाबीत आनंदाने भोगले. त्यामुळे पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू मानत नाही, पण ते मला मानत आहेत. कारण त्यांनी आपली शिवसेना फोडली, ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकटकाळात मदत केली त्या बाळासाहेबांची चोरी केली. त्यांनी चोराला मदत केली. त्याला मुख्यमंत्री बनवले. तिकडे नीतीश कुमारांना फोडले, हेमंत सोरेनला तुरुंगात टाकले, केजरीवालांच्या मागे लागले. माझ्या राजन साळवी, रवींद्र वायकर, किशोरी पेडणेकर, सूरज चव्हाण, अनिल परब आहेत त्यांना त्रास दिला जातो आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -