पुणेकरांनो आरोग्याला जपा! फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

पुणेकरांनो आरोग्याला जपा! फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

पुणे शहराच्या तापमानात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर आता एप्रिल महिन्यात देखील पुण्याच्या तापमानात वाढ होत आहे. पुण्यात उन्हाचे प्रमाण वाढले आहे. सकाळी सुरु होणाऱ्या उन्हाचे चटके संध्याकाळपर्यंत लागत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापामान नोंदवलं गेलं. येत्या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. देशाच्या उत्तरेकडील भागातून उष्ण वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहताना वाऱ्याची दिशा बदलल्याने तापमानात अचानक वाढ झाल्याचे आयएमडी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. IMD Officer Pune February recorded the highest temperature in 147 years

तापमानात वाढ 

मागच्या चार दिवसांपासून पुण्यातील तापमान चाळिशीच्या पलीकडेच आहे. शहरात भर दुपारी फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. सरासरी कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवलं जात आहे. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक तापमानात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूरनंतर आता पुणए सर्वात उष्ण शहर झाले आहे. कायम थंड वातावरण अशी ओळख असलेल्या पुण्याची आता हाॅट सीटी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची शक्यता सांगितली होती. मात्र, उन्हाचा कहर वाढत आहे. बुधवारी, 5 एप्रिलला पुन्हा पारा वर चढला आहे.

( हेही वाचा: जागतिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराच्या मतदानासाठी मुंबईचे पत्रकार नरेंद्र बंडबे यांची निवड )

अशी घ्या काळजी

( हेही वाचा: Health Tips : खोकला आणि सर्दीपासून आराम मिळण्यासाठी ‘या’ काढ्याचे करा सेवन )

First Published on: April 6, 2023 3:10 PM
Exit mobile version