घरताज्या घडामोडीजागतिक 'गोल्डन ग्लोब' पुरस्काराच्या मतदानासाठी मुंबईचे पत्रकार नरेंद्र बंडबे यांची निवड

जागतिक ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराच्या मतदानासाठी मुंबईचे पत्रकार नरेंद्र बंडबे यांची निवड

Subscribe

'गोल्डन ग्लोब' पुरस्कार (Golden Globe Award) या जागतिक पुरस्कारासाठी मतदार म्हणून मुंबईचे पत्रकार नरेंद्र बंडबे (Narendra Bandabe) यांची निवड करण्यात आली आहे. 'गोल्डन ग्लोब' पुरस्काराचं यंदा 81 वे वर्ष आहे. गतवर्षी या पुरस्कारासाठी मतदार म्हणून जगभरातील 103 पत्रकारांची निवड करण्यात आली होती.

‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार (Golden Globe Award) या जागतिक पुरस्कारासाठी मतदार म्हणून मुंबईचे पत्रकार नरेंद्र बंडबे (Narendra Bandabe) यांची निवड करण्यात आली आहे. ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराचं यंदा 81 वे वर्ष आहे. गतवर्षी या पुरस्कारासाठी मतदार म्हणून जगभरातील 103 पत्रकारांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये भारतातल्या मीनाक्षी शेड्डे यांचा समावेश होता. यंदा नरेंद्र बंडबे यांची निवड झाली आहे. (golden globe award journalist narendra bandabe has been selected for the golden globe award voter)

‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराबाबत पत्रकार नरेंद्र बंडबे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. दरम्यान, जागतिक स्तरावरील सिनेमांवर मराठीतून लिहिणारे आणि गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी मतदान करणारे ते एकमेव मतदार आहेत. अनेक जागतिक पातळीवरील चित्रपट महोत्सवांत नरेंद्र बंडबे यांनी हजेरी लावली आहे. शिवाय, बर्लिन, कार्लोवी वॅरी सारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवांतदेखील त्यांनी हजेरी लावली. तसेच केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातदेखील फिप्रेक्सी ज्यूरी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Narendra Bandabe (@narendrabandabe)

- Advertisement -

1944 सालापासून ‘द हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन’ (HFPA) तर्फे ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ दिला जातोय. जगाभरातील 62 देशांमधील मतदार या पुरस्कारासाठी मतदान करतात. सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील मंडळींना हा पुरस्कार देण्यात येतो. ऑस्करप्रमाणेच ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’देखील सिनेसृष्टीतील एक मानाचा पुरस्कार सोहळा आहे.

‘असे’ होते नामांकनाची प्रक्रिया

- Advertisement -
  • अमेरिकन तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि मालिकांना ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार दिले जातात.
  • अमेरिकेच्या फिल्म प्रॉडक्शन कंपन्या आपल्या सिनेमांची आणि मालिकांची एन्ट्री ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारासाठी पाठवतात.
  • त्यानंतर गोल्डन ग्लोबसाठीचे मतदार सिनेमा आणि मालिकांसदर्भातील वेगवेगळ्या कॅटेगरीबद्दलचे त्यांचे मत नोंदवतात.
  • 1 ते 5 मध्ये त्यांना रेट द्यावे लागते.
  • त्यानंतर द अर्नेस्ट आणि यंग ही मते विचारात घेऊन नाकांकनाची अंतिम यादी तयार करतात.

मतदार आणि मतदान

  • जगभरातील 200 हून अधिक मतदरांमध्ये 52 टक्के महिला मतदार आहेत.
  • 51.5 टक्के पुरुष मतदार आहेत.
  • जगभरातल्या 62 देशांमध्ये 43.5 टक्के मतदार युरोपातले आहेत.
  • 18.5 टक्के लॅटिन अमेरिका आणि 17 टक्के आशियातले आहेत.
  • यंदा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारासाठी मतदारांचा संख्या 200 हून अधिक झाली.

हेही वाचा – ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी महिला आयोगाची नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -