सत्यवानाची सावित्री आम्हाला समजली, मात्र जोतिबांची सावित्री समजली नाही – रुपाली चाकणकर

सत्यवानाची सावित्री आम्हाला समजली, मात्र जोतिबांची सावित्री समजली नाही – रुपाली चाकणकर

वडाची पुजा करणारी सत्यवानाची सावित्री आम्हाला समजली. मात्र, स्वत:च्या अंगावर शेणाचे शिंतोडे उडवून घेणारी जोतिबांची सावित्री मात्र, आम्हाल समजली नाही हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे. जोतिबांच्या सावित्रीचा संघर्ष आपल्याला माहित आहे. मात्र, या संघर्षाला सावित्रीबाई समोर गेल्या म्हणून मी आज माझे मत मांडू शकत आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.

माझा आणि वटपोर्णिमेचा फार संबंध आला नाही. लग्नानंतर एकदाही मी वडाची पुजा केली नाही. माझ्या साहेबांना सांगते की मीच हवी असेल तर तुम्ही वडाला फेऱ्या मारा. माझ्याकडून वडाची पुजा होणार नाही. माझ्या पतीनेदेखील भावा समजून घेतल्या असेही त्या म्हणाल्या.

पर्यावरणाचा विचार महिलांनी करायला हवा –

वडाची पुजा करताना निसर्गाचा आणि पर्यावरणाचा विचार महिलांनी करायला हवा वडाच्या झाडापासून ऑक्सिजन जास्त मिळतो. त्यामुळे वडाचे झाड लाव हा संदेश दिला. मात्र, दुदैवाने वटपोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी वडाचे झाड बघतो तर झाड झुकलेल्या अवस्थेत दिसते. अंधश्रद्ध निर्मुलन समितीचे लोक त्या झाडाला या बंधनातून मुक्त करताना दिसताच, असा प्रयावरण संदेश रुपाली चाकणकर यांनी दिला.

त्यादिवशी खरी सावित्री जागी होईल –

ज्या महिला माझ्याकडे पतीने मारहाण केली किंवा दारु पितो अशी तक्रार घेऊन येतात. त्याच महिला मला वटपोर्णिमेला पुजा करताना दिसतात. त्यावेळी त्यांचे उत्तर असते की कुटुंबीयांच्या किंवा सामाजाच्या लाजेखातर ही पुजा करावी लागते. समाज काय म्हणेल याचा विचार आपण आधी करतो आहोत. पण आपला पती कसा आहे. त्या पतीमध्ये कशी सुधारणा घडवून आणता येईल, याकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात. त्यामुळे हे मारहाणीचे आणि अत्याचाराचे प्रकार सातत्त्याने सुरु आहेत. ज्यादिवशी समाजाचा विचार करुन महिला स्वत:त सुधारणा घडवून आणेल त्यादिवशी खरी सावित्री जागी होईल, असे रुपाली चाकणकर म्हणल्या.

First Published on: June 14, 2022 1:05 PM
Exit mobile version