अहमदनगरमध्ये कैद्यांसांठी सुरु झाले रेडिओ स्टेशन!

अहमदनगरमध्ये कैद्यांसांठी सुरु झाले रेडिओ स्टेशन!

रेडिओ स्टेशन

तुरुंग म्हटलं की डोळ्यांसमोर उभ्या राहतात बंद खोल्या, अंधार आणि त्या तुरुंगांमध्ये राहणारे कैदी. वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून वेगवेगळे कैदी या ठिकणी आलेले असतात. तुरुंगामध्ये आल्यानंतर कैद्यांची मानसिक स्थिती खालावते. त्यांना एकटे वाटते. त्यांची चिडचिड होते. तर कुणी बोलतच नाही. कुणी भांडणं, मारामारी करतात. परंतु, या सगळ्या गोष्टींचा विचार करुन कैद्यांनाही हलकंफुलकं वाटावं म्हणून अहमदनगरमधील जेल प्रशासनाने एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. आणि तो उपक्रम म्हणजे जेलमध्ये आंतरिक रेडिओ स्टेशन.

याअगोदर बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानेही पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये आरजेचे काम केले होते. आता येरवडा तुरुंगाप्रमाणे अहमदनगरच्याही तुरुंगात आंतरिक रेडिओ स्टेशनला सुरुवात झाली आहे. परंतु, या रेडिओ स्टेशनला आरजे म्हणून कुणी सेलिब्रेटी नसणार आहे. सामान्य कैद्यांपैकीच कुणीतरी आरजे असणार आहे.

अहमदनगर जेल प्रशासनाच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. हा एक अनोखा उपक्रम म्हणून जनमानसांत प्रतिक्रिया उमटताना दिसते आहे. कैंद्यांमध्ये सुधारणा व्हावी, त्यांच्या वागणुकीत बदल व्हावा, यासाठी आंतरिक रेडिओ स्टेशन लाँच केल्याचे सांगितलं जातय. कैद्यांना या रेडिओचा आनंद मिळावा म्हणून जागोजागी स्पीकर बसविण्यात आले आहेत.

हे रेडिओ स्टेशल कैद्यांसाठी असून, तेच चालविणार आहेत. या रेडियो स्टेशनवर आरोग्यासंबंधित सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. त्यांची फर्माइश गाणे या स्टेशनमध्ये वाजविण्यात येतील. त्याचबरोबर भजनही लावले जाईल.

एन. जे. सावंत, तुरुंग अधीक्षक

First Published on: May 11, 2018 10:30 AM
Exit mobile version