Raghunath Kuchik rape case : पीडित तरुणीसोबत लढून चूक केली का?, मला अडकवण्यासाठी सगळे अॅक्शन मोडमध्ये – चित्रा वाघ

Raghunath Kuchik rape case : पीडित तरुणीसोबत लढून चूक केली का?, मला अडकवण्यासाठी सगळे अॅक्शन मोडमध्ये – चित्रा वाघ

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडित तरुणीने गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, राजकारणात आणि समाजकारणात अनेक अनुभव येत असतात. त्यातलाच एक असाच अनुभव मला आला आहे. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केला आणि जबरदस्ती तिचा गर्भपात केला. तो सुद्धा चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन करण्यात आला आहे. अशा पद्धतीचे पत्र आणि प्रत्यक्षात भेट पीडितेची आणि माझी झाली. १६ फेब्रुवारीला मी महाराष्ट्राच्या बाहेर असताना मला फोन आला. पुण्यातील शिवाजीनागर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी मला तुमची मदत पाहिजे. तेव्हा मुंबई महाराष्ट्राबाहेर होते त्यामुळे आल्यावर भेटू आणि गरज भासल्यास फोन कर असे मेसेज केला असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडितेच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, पीडितेसोबत १८ फेब्रुवारीला भेट झाली त्यानंतर तीने मला २०१७ पासूनची घटना सांगितली. असा कोणी माणूस नसेल जो हे ऐकल्यानंतर हळवा होणार नाही आणि किंवा तो विचार करायला मजबूर होणार नाही. जी मुलगी एकटी लढत आहे. तिचा एकटेपणाचा कोणी गैरफायदा घेत आहेत. एकदा नव्हे तर ३ वेळा असा प्रकार तिच्यासोबत घडला आणि तिच्यासोबत मी लढायचे ठरवलं, चूक केली का? एखादी पीडिता जर आपल्यासमोर येऊन व्यथा मांडत आहेत. पुरावे देत आहे. मला काय माहिती पुण्यातील ४ रुग्णालय, मला काय माहिती कोळेकरचे रुग्णालय बुधवार पेठेत आहे की, सोमवार पेठेत आहे. मला काय माहिती मंगेशकर रुग्णालयात कुचिकचे कोणते आयकार्ड दाखवण्यात आले. ही सगळी माहिती मला पीडितेकडून मिळाली होती. जेव्हा पूर्ण केस स्टडी केल्यानंतर तेव्हा कळाले हीच्यासोबत आपण लढलं पाहिजे चूक केली का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

मला काय माहिती बुधवारपेठेतील रुग्णालय, ही सगळी माहिती मला मिळाली , ही माहिती त्या मुलीकडून मिळाली जेव्हा त्या मुलीने व्यथा सांगितली तेव्हा मी तिच्यासोबत लढायचे ठरवलं, पार्टी ऑफिसमध्ये त्या मुलीन सगळी हकीकत सांगितली. कसा त्रास दिला जात आहे. ससून रुग्णलायात कशाप्रकारे वागणूक दिली जात आहे, या सगळ्या घटना आणि पुरावे मुलीने दिले होते. तिला आमच्या ओळखीतील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. परंतु तिकडे ती उपचार घेत नव्हती असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

पीडितेला संरक्षण दिले पाहिजे 

भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, ती मुलगी आता कोणत्या परिस्थितीमध्ये असे बोलत आहे माहिती नाही. परंतु आजही तिच्या बाजूने मी उभी आहे. तिला संरक्षण दिले पाहिजे असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. तसेच फेब्रुवारीपासून लढत आहोत. तेव्हा कोणीही आले नाही परंतु आता चित्रा वाघ विरोधात असल्यामुळे सगळ्यांना जाग आली आहे. आता नवीन एफआयआरसुद्धा हे लोकं करतील.

मी चौकशीसाठी तयार 

माझ्या घरावर हल्ला करुन झाले आता मला अडकवण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. तरीसुद्धा सुरुवातीलाच मला अनेक जण म्हणाले होते. या प्रकरणात पडू नका तुमच्यावरच उलटेल. परंतु माझा सीडीआर तपासा, माझी चौकशी करा, सगळे पुरावे काढा मी चौकशीला तयार आहे असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

मुलीचा कालच मेसेज आला होता

पीडित तरुणीने आपल्या कालसुद्धा मेसेज केला होता अशी माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. कालचा दुपारी मला मुलीचा मेसेज आला आहे. कुठला कोण माणूस मला माहिती नाही मला भेटण्याची गरज नाही. गोव्यात मला चित्रा वाघ यांनी नेले, जेव्हा मला मेसेज आला तेव्हा ते मेसेज सिपीपासून राज्याच्या गृहमंत्र्यांनासुद्धा चित्रा वाघ यांनी मेसेज पाठवला आहे. भेटल्यानंतर दुसऱ्या क्षणाला पोलिसांना मी कळवले आहे. मुलगी जे बोलते ते सगळं तपासा माझीतयारी आहे. कोणीतरी आले दस्तावेज दिले आणि माझ्या जागी कोणी असते त्यांनीसुद्धा मी केले तेच केले असते. ३ वाजून १९ मिनिटांनी मला मेसेज आहे. एका पत्राचा स्क्रिनशॉट पाठवला असे चित्रा वाघ यांनी सांगितले. मला या माणसाचा कंटाळा आला असून रोजरोजच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे पीडित म्हणाली असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : Raghunath Kuchik rape case : चित्रा वाघ यांच्या दबावामुळेच केले आरोप- पीडितेचा यू टर्न

First Published on: April 12, 2022 5:10 PM
Exit mobile version