Raghunath Kuchik rape case : चित्रा वाघ यांच्या दबावामुळेच केले आरोप- पीडितेचा यू टर्न

Raghunath Kuchik rape case the victim allegations chitra wagh make pressure to gave reports against kuchik
Raghunath Kuchik rape case : चित्रा वाघ यांच्या दबावामुळेच केले आरोप- पीडितेचा यू टर्न

पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या पीडित तरुणीला न्याय देण्यासाठी चित्रा वाघ प्रयत्नशील होत्या. रघुनाथ कुचिक यांना अटक करण्यात यावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती. परंतु या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पीडित तरुणीने चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनी पोलीस तपासात विशिष्ट जबाब नोंदवण्यासाठी भाग पाडले असा आरोप पीडित तरुणीने केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांना बलातक्रारप्रकरणी अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. पडिती तरुणीला पोलिसांत तक्रार करण्यासाठी पीडित तरुणीला चित्रा वाघ यांनी सांगितले होते. परंतु एका खाजगी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तरुणीने धक्कादायक खुलासा केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीच मला विशिष्ट जबाब देण्यास भाग पाडले होते. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवण्यात आलं होते. याशिवाय चित्रा वाघ यांनी पोलिसांना फक्त विशिष्ठ घटना सांगायला भाग पाडलं महंम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण सगळं तयार केले असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

तरुणीने पुढे म्हटलं आहे की, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मेसेजचे जे पुरावे सादर केले आहेत. ते पुरावे खोटे आहेत. एक विशिष्ट यंत्रणा वापरुन कुचिक यांच्या आणि माझ्या मोबाईलवर मेसेज येत आहेत. तसेच पवार नावाच्या एका व्यक्तीने काल एक पत्र आणून दिले आहे. तसेच ते पत्र रघुनाथ कुचिक यांनी हे पत्र पाठवले असे भासवण्यात आले असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

चित्रा वाघ यांची तरुणीच्या आरोपांवर प्रतिक्रिया

पीडित तरुणीने केलेल्या आरोपांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या की, पीडितीने माझ्याव केलेले आरोप ऐकले, खरतर वाईट वाटलं पण हरकत नाही. असे अनुभव आयुष्यात येत असतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहिले तेव्हा कुणी तिच्या मदतीला उभे राहिले नव्हते. पंरतु माझ्याविरोधात सगळे एकत्र आले असल्याचा आनंद आहे. मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे. अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.


हेही वाचा : रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरण: तरुणीला इंजेक्शन देत गोव्यात नेलं; चित्रा वाघ यांचा धक्कादायक दावा