पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर, जाणून घ्या कसे होणार कामकाज?

पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर, जाणून घ्या कसे होणार कामकाज?

मुंबई : राज्यात मोठ्या सत्तांतरणानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाने नवे सरकार स्थापन झाले. या नव्या सरकारचे विधीमंडळाचे पहिले पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपासून सुरु होणार होते. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारामुळे हे पावसाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात आले आहे. ज्यानंतर अधिवेशनासाठी नवा मुहूर्त शोधण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 17 ते 23 ऑगस्टपर्यंत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. याबाबत अधिवेशन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

बुधवार १७ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधानपरिषदेत अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवणं, २०२२-२३ त्या पुरवणी मागण्या सादर करणे यावर कामकाज होणार आहे. गुरुवार १८ ऑगस्ट रोजी दोन्ही सभागृहात नियोजित शासकीय कामकाज होईल. तर, १९ ऑगस्टला गोपाळकाला असल्याने दोन्ही सभागृहांना सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. तसेच, शनिवार आणि रविवारीही सुट्टी असल्याने कामकाज होणार नाही.

सोमवारी, २२ ऑगस्ट रोजी २०२२-२३ च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान, शासकीय कामकाज दोन्ही सभागृहात होईल. मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी पुरवण्या मागण्यांवर चर्चा आणि मतदान, शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयक २०२२ वर चर्चा होणार आहे. २४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोतस्व कार्यक्रम होईल. तर, गुरुवार २५ ऑगस्ट रोजी दोन्ही सभागृहात शासकीय कामकाज होईल.

दरम्यान, यावेळी पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रात झालेले सत्तांतर पाहता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल होण्याची शक्यता आहे.

First Published on: August 10, 2022 7:40 PM
Exit mobile version