मंदिरे उघडली पाहिजेत, अन्यथा मंदिराबाहेरच घंटानाद करणार – राज ठाकरे

मंदिरे उघडली पाहिजेत, अन्यथा मंदिराबाहेरच घंटानाद करणार – राज ठाकरे

शिवतीर्थावर मनसे मोठं शक्तिप्रदर्शन करणार; मुंबईतील मनसेची बैठक संपली

राज्य सरकारकडून दहीहंडी सणावर निर्बंध घातल्यानंतर मनसेकडून मुंबईसह ठाण्यात दहीहंडी फोडण्यात आली. मी महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिले होते, दहीहंडी फोडा, जे होईल ते होईल, अशा शब्दात दहीहंडी फोडण्याबाबत मनसेकडून प्रतिक्रिया आली. सरकारवर टीका करतानाच राज ठाकरे म्हणाले की, तुम्हाला रस नसेल तर दहिहंहडी साजरी करू नका, ज्यांना दहीहंडी साजरी करायची आहे ते करतील. थर लावू नका असे सरकार म्हणून जर तुम्ही सांगत असाल, तर मग काय खुर्चीवर उभ राहून काठीने हंडी फोडायची का ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

सरकारमधील राजकीय पक्षांनी सभा घ्यायच्या, मेळावे घ्यायचे, सत्ताधाऱ्यांसाठी मंदिरे सुरू आहेत. कोरोनाच्या नावाने निर्बंधने घातल्यानंतरही कुठेही गर्दी कमी झालेली नाही. महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या नाहीत. फक्त या सणांवरच तुम्ही कसे काय नियम घेऊन येता ? त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांना जोरात हंडी साजरी करण्याचे आदेश दिले होते. काय होईल ते होईल, असे आदेश मी दिले होते असेही राज ठाकरेंनी सांगितले.

राज्यातील मंदिरे ही उघडली गेली पाहिजेत. आजचा दिवस झाल्यानंतर मंदिरे उघडण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहोत. मंदिरे ही उघडलीच पाहिजेत, नाही तर सगळ्या मंदिरांबाहेर घंटानाद करू, असाही इशारा राज ठाकरेंनी दिला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Raj Thackeray gave order to party workers to make agaitation for reopening of temples in maharashtra )

तुमची तयारी झाली की निवडणुका

सगळे सण साजरे झाले पाहिजेत. नियम लावायचे आहेत तर सगळ्यांना नियम एकच लावा असेही त्यांनी खडसावले. यांची बाहेर पडायला फाटते यात आमचा काय दोष असाही सवाल राज ठाकरेंनी केला. तिसरी लाट येणार का ? या मुद्दयावर समुद्र आहे का ? असे उत्तर त्यांनी दिले. उगाच इमारती सील करण्याचे प्रकार सुरू आहेत. याआधी कधी साथ आली नव्हती. सगळ्यांना बंद करून ठेवायचे. यांची आखणी झाली की निवडणूका जाहीर करायच्या. त्यामुळे सगळे तोंडावर पडतील अशी ही रणनिती असल्याचेही ते म्हणाले. मी सर्वांना सांगितले आहे तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. मीदेखील बाहेर पडतो आहे.

अस्वलाच्या अंगावर केस किती मोजत नाहीत

सगळ सूडबुद्धीने सुरू आहे. मनसे कार्यकर्त्यांवर दही हंडी साजरी केल्यासाठी केसेस दाखल केल्याची माहिती आहे. अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते अस्वल मोजत नाही. त्याचप्रमाणे आमच्यावर किती केसेस दाखल झाल्या त्या आम्ही मोजत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. आजची दहिहंडी झाल्यानंतर मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.


हे ही वाचा – निर्बंध झुगारत मनसेने काळाचौकीत फोडली दहीहंडी, बाळा नांदगावकर पोलिसांच्या ताब्यात


 

First Published on: August 31, 2021 12:12 PM
Exit mobile version