घरमुंबईनिर्बंध झुगारत मनसेने काळाचौकीत फोडली दहीहंडी, बाळा नांदगावकर पोलिसांच्या ताब्यात

निर्बंध झुगारत मनसेने काळाचौकीत फोडली दहीहंडी, बाळा नांदगावकर पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडीच्या दिवशी दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली आहे. असे असताना विरोधकांकडून सरकारच्या निषेधार्थ हा दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. ठाणे, मुंबईसह घाटकोपर भटवाडी, वरळी नाका येथे मनसेने हंडी फोडली. सण-उत्सवाच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. परंतु असे असताना देखील दहीहंडी साजरी करण्याबाबत भाजप आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचा कहर अद्याप पुर्णतः संपलेला नसताना आणि राज्य सरकारने दहीहंडी साजरी करण्याबाबतच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र असे असताना देखील या निर्बंध झुगारत मनसेने काळाचौकीत दहीहंडी फोडली.

दरम्यान, कोरोनाचे निर्बंध असताना देखील मनसे नेते बाळा नांदगावकर दहीहंडी फोडण्यासाठी आणि उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई काळाचौकी परिसरातल्या मैदानात दाखल झाले. यावेळी जमलेली गर्दी बघता पोलिसांनी त्यांना अडवले. आम्ही आमचे सण साजरे करणारच; प्रतिकात्मक दहीहंडी फोडू द्या, अशी मागणी देखील नांदगावकर यांनी केली. मात्र ती नाकारत पोलिसांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

नोटिसा पाठवल्या तरी उत्सव साजरा करणारच

काळाचौकी या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही मनसेने दिला होता. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

यावेळी पोलिसांनी मज्जाव केला असातानाही प्रतिकात्मक, परंपरेप्रमाणे कमी उंचीची दहीहंडी बांधून ती फोडण्यात आली. जमावबंदीचे आदेश झुगारून मनसेसैनिकांनी घोषणा देत ही दहीहंडी फोडली. त्यामुळे पोलिसांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मनसेसैनिकांसह गोविंदांना ताब्यात घेतले आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -