मुंबई में बैठा हिंदूओ का राजा…राज ठाकरेंच्या उत्तर सभेसाठी मनसेची फलकबाजी

मुंबई में बैठा हिंदूओ का राजा…राज ठाकरेंच्या उत्तर सभेसाठी मनसेची फलकबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन सर्कल येथे जाहीर सभा होणार आहे. मात्र, सभेपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील पाचपाखाडी येथील भागात मुंबई मे बैठा हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. मनसेने हिंदूत्त्वाच्या मुद्द्यावर उडी घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

ठाण्यातील विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी राज ठाकरेंच्या सभेसंदर्भातील एक डिजिटल बॅनर लावला आहे. विशेष म्हणजे हा बॅनर हिंदीत लिहिण्यात आला आहे. मुंबई मे बैठा हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा, अशी उपाधी राज ठाकरेंना या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या फलकामध्ये त्यांनी प्रामुख्याने मराठी ऐवजी हिंदूओ का राजा, असा राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मनसे हिंदूत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांवर टिका करत आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशीही राज ठाकरे यांनी मशीदीच्या भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतु राजकीय पक्षातून टीका होऊ लागल्यामुळे राज ठाकरेंची ठाण्यात आज उत्तर सभा आहे. या सभेला राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : उत्तरसभेच्या वेळेआधीच राज ठाकरे लावणार ठाण्यात हजेरी, स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज राहण्याची शक्यता


 

First Published on: April 12, 2022 12:55 PM
Exit mobile version