घरताज्या घडामोडीउत्तरसभेच्या वेळेआधीच राज ठाकरे लावणार ठाण्यात हजेरी, स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज...

उत्तरसभेच्या वेळेआधीच राज ठाकरे लावणार ठाण्यात हजेरी, स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज राहण्याची शक्यता

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होणार आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणानंतर राज ठाकरेंवर जोरदार टीका झाली. त्यामुळे आज ठाण्यात राज ठाकरे जाहीर सभा घेणार असून प्रत्युत्तर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरेंची उत्तरसभा सायंकाळी असली तरी देखील सभेच्या वेळेपूर्वीच म्हणजे दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याचं सांगितलं जातंय. सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन ते दुपारीच ठाण्यात मुक्कामी येणार आहेत. तसेच त्यांच्या स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या उत्तरसभेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी २०० चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वार सभेला येणार आहेत. तसंच मनसैनिक ६०×४० फुटांचा हनुमानाचा झेंडा पालघरवरुन आणणार आहेत. तर नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते सभेसाठी ठाण्यात येणार आहेत. एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग या सभेच्या निमित्ताने फुंकले जाणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज ठाकरे यांची ठाण्यातील उत्तरसभा ही ९ एप्रिल रोजी होणार होती. तलावपाळी या ठिकाणी सभा घेण्याचा प्रस्ताव मनसेने पोलिसांना दिला होता. पण या ठिकाणी ९ तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे ही सभा आज १२ तारखेला होणार आहे.

राज ठाकरे यांची आजची ठाण्यातली सभा विरोधकांसाठी ही उत्तर सभा आहे. लाव रे तो व्हिडिओ राज ठाकरे विसरलेत का असे म्हणणाऱ्यांना आजच्या सभेतून उतर मिळेल, असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचं लाव रे तो व्हिडिओ हा प्रचाराचा पॅटर्न लोकप्रिय झाला होता. त्यामुळे संदीप देशपांडे यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे ठाण्यातील उत्तर सभेतही पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकायला मिळणार अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

- Advertisement -

राज ठाकरेंची आज सायंकाळी ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन सर्कल येथे जाहीर सभा होणार आहे. सभेच्या आधी दोन टीझरही मनसेकडून जाहीर करण्यात आले आहेत. आज होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.


हेही वाचा : भ्रष्टवादी पक्षांबरोबर सत्तेसाठी भाव करत नाही, अमेय खोपकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -