Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पुन्हा कोरोनाचा शिरकाव, एका कर्मचाऱ्याला कोरोना

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पुन्हा कोरोनाचा शिरकाव, एका कर्मचाऱ्याला कोरोना

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर पुन्हा कोरोनाचा शिरकाव, एका कर्मचाऱ्याला कोरोना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. शिवतीर्थावर पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. खबरदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच राज ठाकरे यांनी आगामी १० दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. राज ठाकरे यांनाही यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. दरम्यान आता एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या अनेक नेत्यांशी भेटीगाठी सुरु आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी कऱण्यात आली या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल अद्याप प्राप्त झाले नाही. या कर्मचाऱ्यांचा चाचणी अहवाल आज किंवा उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी आपले पुढील १० दिवसांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच ज्या पूर्वनियोजित भेटी होणार होत्या त्या सुद्धा करण्यात आल्या आहेत.

राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पुन्हा पसरत आहे. राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी दिली आहे. यानंतर अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एका दिवसात मंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते अतुल भातखळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, खासदार अरविंद सावंत तसेच विद्या ठाकुर यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा : Corona Virus : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

First Published on: January 4, 2022 2:53 PM
Exit mobile version