…तर आव्हाडांना गोल गोल फिरवून फेकून देईन, राज ठाकरेंची आव्हाडांवर उपरोधिक टीका

…तर आव्हाडांना गोल गोल फिरवून फेकून देईन, राज ठाकरेंची आव्हाडांवर उपरोधिक टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यामध्ये घेतलेल्या उत्तरसभेत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागाचा फणा काढल्यासारखे जितेंद्र आव्हाड बोलतात, अशी उपरोधिक टीका राज ठाकरेंनी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या आवाजाची नक्कल राज ठाकरेंनी करून दाखवली. याशिवाय मुंब्र्यातून अटक केलेल्या अनेक दशतवाद्यांच्या नावांचा पाढा राज ठाकरे यांनी वाचून दाखवला आहे.

यावेळी राज ठाकरे मशीदीवरील भोंग्यांसंदर्भात अल्टीमेटम देत म्हणाले की, “मशिदीच्या भोग्यांचा देशभर त्रास आहे. आज माझं भाषण ऐकणाऱ्या हिंदूंना माझं सांगण आहे. 3 तारखेपर्यंत ऐकले नाहीत तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील जिथे बांग सुरु असेल तिथे हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. देशभर लागले पाहिजे… आम्हाला जो त्रास होतो तो त्यांना होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही. इकडचे ते आव्हाड.. नागाने फणा काढावा तसा… आता उद्या काय तरी बोलतीलचं डसू शकतो.. बिसू शकतो.. ये शेपटा धरतो.. गरगर फिरतो आणि फेकू देतो. अशा शब्दात राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांवर उपरोधिक टीका केली आहे.

राज ठाकरेंनी मुंब्र्यातून अटक केलेल्या दशतवाद्यांच्या नावांचा पाढा वाचत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. “राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार, कुठच्या दर्ग्यामध्ये, मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला तरी राजकारणातून सन्यास घेऊन.. सापडेलचं कसा दाढी करतचं नाहीत… वस्तरा कसा सापडेल? बरं इकडून तिकडून आव्हाडांना वस्तराच दिसला? मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आता चार गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो.” असं राज ठाकरे म्हणाले.

मुंब्र्यातून अनेक दशतवाद्यांना अटक, राज ठाकरे यांनी वाचली नावे

२४ ऑगस्ट २००१ रोजी मुंब्रा कौसा परिसरात सीमी नावाच्या आतंकवादी संघटनेच्या सहा हस्तकांना अटक

२० डिसेंबर २००१ रोजी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी कुख्यात अबू हाजमा याला मुंब्र्यातून अटक

१६ मार्च २००२ रोजी मुंब्र्यातून कुख्यात हिजबूल मुजाहुद्दीन संघटनेच्या चार अतिरेक्यांना अटक

कोणा एका नेत्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिघांना अटक,

२३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद

गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इश्रात जहा शेख ही देखील मुंब्र्यात राहत होती.

२०१६ मध्ये ताब्यात घेतलेल्या आयसीसचा हिंदुस्तानातील म्होरक्या मुदब्बिर शेख कित्येक वर्षे मुंब्र्यातील अमृतनगर येथे राहत होता.

१७ एप्रिल २००३ रोजी लष्कर- ए-तोयब्बाच्या दोन अतिरेक्यांना अटक

१६ मे २००३ रोजी मुंब्र्या येथूनच मुलुंड बॉम्ब स्फोटाप्रकरणी मोहम्मद मेमुद्दीन या व्यावसायिकाला अटक

मुंब्र्यातून रिजवान मोमीन या अतिरेक्याला अटक

२६ जानेवारी २०१९ मध्ये मुंब्रा येथील तलाह उर्फ अबूक बकार, हनीफ कोत्रीक याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. हे सगळे मुंब्र्यातील आहे. जेथून आव्हाड निवडून येतात.

“आता तुम्ही म्हणाल वस्तरा नाही सापडला…आता कसा संन्यास घेणार… मी कुठे बोललो अतिरेकी सापडत नाही. या अशा अनेक असंख्य घटना देशातील मदरश्यांमध्ये चालल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानमधील अनेक हस्तक आहेत. याच्यामध्ये अतिरेकी आहेत, शस्त्र सापडत आहेत. यामध्ये देशामधील प्रामाणिक, जो खरचं या देशावर प्रेम करणारा मुसलमान तो यामध्ये भरडला जातोय” असा खुलासा देखील राज ठाकरे यांनी केला आहे.


Raj Thackeray live : राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या ‘या’ दोन मागण्या

First Published on: April 12, 2022 9:50 PM
Exit mobile version