राज ठाकरे आज लिलावती रुग्णालयात होणार दाखल, लवकरच होणार शस्त्रक्रिया

राज ठाकरे आज लिलावती रुग्णालयात होणार दाखल, लवकरच होणार शस्त्रक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) आज लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार आहेत. त्यांच्या पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. परंतु आज दुपारी ते लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत.

राज ठाकरे यांच्यावर उद्या हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. पण काही चाचण्यांसाठी राज ठाकरे आज लिलावती रूग्णालयात दाखल होतील. आज या चाचण्या पार पडणार असून उद्या शस्त्रक्रिया पार पडणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसीय पुणे दौऱ्यावर

राज ठाकरे मे महिन्यात पुणे दौऱ्यावर होते. परंतु त्यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांनी पुणे दौरा अर्धवट सोडला होता. तसेच ते मुंबईला परतले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी आपला अयोध्या दौरा स्थगित केल्याचं जाहीर केलं. येत्या ५ जून रोजी राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह अयोध्या दौऱ्याला जाणार होते. परंतु पायाचं दुखणं अधिकच वाढल्याने डॉक्टरांनी शस्त्रकियेचा सल्ला दिला होता. त्यामुळे अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं.

हीप बोनची प्रमुख कारणं काय?

बदलती जीवन शैली आणि हाडात असणारी कॅल्शियमची कमतरता ही हीप बोनची प्रमुख कारणं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हिप बोनचा त्रास सांध्यांमध्ये जास्त जाणवतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.


हेही वाचा : दोन मतं जरी नाही मिळाली तरी अडचण होणार नाही – छगन भुजबळ


 

First Published on: June 18, 2022 12:44 PM
Exit mobile version