राज ठाकरेंचा ‘लेझर शो’ वर्षभरापासून बंद

राज ठाकरेंचा ‘लेझर शो’ वर्षभरापासून बंद

राज ठाकरेंचा 'लेझर शो' वर्षभरापासून बंद

नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज ठाकरे यांनी नाशिकच्या वनौषधी उद्यानात ‘लेझर शो’ बनवला होता. या उद्यानात हा ‘शो’ उभारताना राज ठाकरे यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यांना या ‘शो’साठी वनखात्याकडून जागा मिळावी म्हणून बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले होते. या सर्व अडचणींना सामोरे जावून राज ठाकरे यांनी वनौषधी उद्यानाची जमिन मिळवली होती. त्यानंतर टाटा समूहाच्या माध्यमातून ठाकरे यांनी तिथे भव्य ‘लेझर शो’ उभारला होता. परंतु, हा ‘शो’ गेल्या गेल्या वर्षभरापासून बंद आहे.

हेही वाचा – वाचा काय असेल बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकामध्ये

‘लेझर शो’ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

राज ठाकरेंच्या या ‘लेझर शो’ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. लोकमत या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार हा शो सुरु झाल्यापासून वनखात्याने आतापर्यंत ८० लाख रुपये कमविले आहेत. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे हा शो बंद झाला आहे. या शोला बंद होऊन एक वर्ष होऊन गेलेला आहे, तरीही वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या तांत्रिक अडचणींना शोधण्यासाठी पाच लाख रुपये लागणार आहेत. परंतु, या पाच लाख रुपयांची तरतूद कुठेच नसल्यामुळे हा विलंब होत आहे. या लेझर शोच्या देखभालीसाठी वनविभागाकडे कुठलेही खाते नाही.

हेही वाचा – राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून सरकारला ‘अवनी’ फटकारे!

वनविभागाकडून शासनाला पत्रव्यव्हार

या ‘लेझर शो’च्या दुरुस्तीसाठी वनविभागाने शासनाशी पत्रव्यव्हार केला आहे. या ‘शो’च्या दुनरुस्तीसाठी वनविभागाकडे कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे वनविभागाला शासनाकडून दुरुस्तीसाठी पैसे मिळावे, यासाठी हा पत्रव्यव्हार करण्यात आला आहे. परंतु, शासनाकडून वनविभागाला पाच लाख रुपये मिळाले तर या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल.


हेही वाचा – राज ठाकरेंना भाजपचे व्यंगचित्रातून उत्तर

First Published on: November 17, 2018 11:53 AM
Exit mobile version