घरमुंबईराज ठाकरेंचे व्यंगचित्रातून सरकारला 'अवनी' फटकारे!

राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून सरकारला ‘अवनी’ फटकारे!

Subscribe

अवनी वाघीण प्रकरणाची कास धरत राज ठाकरेंनी २०१९च्या निवडणुकांमध्ये भाजप प्रणीत युती अडचणीत सापडणार अशा आशयाचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढून त्यांच्या स्टाईलमध्ये फटकारे मारले आहेत.

सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सध्या अवनी वाघीण प्रकरणावरून सुंदोपसुंदी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये राज ठाकरेंनी चालवलेली व्यंगचित्रमाला राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप नेत्यांना चांगलीच झोंबल्यानंतर आता अवनी प्रकरणावरून राज ठाकरेंनी काढलेलं व्यंगचित्र सत्ताधाऱ्यांना तिखट फटकारे मारणारे ठरले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी शिवसेनेचीच भूमिका मांडताना भाजप नेत्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हाती ‘माज’!

या व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या चित्रांचा समावेश केला आहे. व्यंगचित्राच्या पहिल्या भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात बंदूक असून तिच्यावर ‘माज’ असं लिहिलं आहे. तर समोर अवनी वाघीण मरून पडलेली आहे. त्यांच्याबरोबर सुधीर मुनगंटीवार आणि मागे युती असं लिहिलेले उद्धव ठाकरे उभे आहेत. या भागावर २०१८ असं वर्ष लिहिलं आहे.

- Advertisement -

युती वाघाच्या तोंडी!

तर दुसऱ्या भागामध्ये राज ठाकरेंनी खरे फटकारे मारले आहेत. दुसऱ्या भागामध्ये वाघिणीवरचं अवनी नाव काढून तिथे महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे. ही वाघीण पहिल्या चित्रातले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोघांना खात असून सुधीर मुनगंटीवार दूर झाडावर चढून बसले आहेत.आणि या भागावर २०१९ असं वर्ष लिहिलं आहे. त्यामुळे २०१९मध्ये मतदार या दोघांना धडा शिकवतील असा आशय या व्यंगचित्रातून व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी – निरूपम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -