सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राजेश पाटील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवे आयुक्त 

सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; राजेश पाटील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नवे आयुक्त 

राजेश पाटील

महाराष्ट्रात शुक्रवारी ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क, पुणे या पदावर करण्यात आली आहे. श्रावण हर्डीकर यांचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. ओडीसा केडरचे सनदी अधिकारी राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच एस. चोकलिंगम यांची नियुक्ती यशदाचे महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाल्यानंतर एन.के. सुधांशु यांची जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शीतल उगले-तेली यांची नियुक्ती संचालक, वस्त्रोद्योग, नागपूर या पदावर; तर प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती वर्धा जिल्हाधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे. भारतीय वायुसेना उपवनसंरक्षक भूमि अभिलेख अनिता पाटील यांची नियुक्ती राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून झाली आहे.

First Published on: February 12, 2021 8:54 PM
Exit mobile version