डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक धोकादायक, राज्यात २१ रुग्ण आढळल्याचे राजेश टोपे यांची माहिती

डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक धोकादायक, राज्यात २१ रुग्ण आढळल्याचे राजेश टोपे यांची माहिती

राज्यातील दारू, वाईन शॉप बंद होणार का?, आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

डेल्टा प्लस व्हेरियंट ७ जिल्ह्यांत पसरला असून आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. हा व्हेरियंट काळजीपुर्वक नसला तरी त्याचे गुणधर्म धोकादायक आहेत. केंद्र सरकारकडून आलेल्या सुचनेत या व्हेरियंटचा संसर्ग हा वेगवान असल्याचे सांगण्यात आलं आहे. याची लागण झाली तर याचा परीणाम जास्त आहे. व्यक्तीमध्ये ज्या प्रतिकारशक्ती तयार झाल्या आहेत या प्रतिकारशक्तीचा परीणाम होऊ न देण्याची ताकद या डेल्टा प्लसच्या व्हेरियंटमध्ये आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट हा कोरोनाचा म्युटंट झालेला व्हेरियंट आहे. तज्ञांनी याचा अधिक धोका असल्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारने एक प्रकल्प ५ पे पासून हाती घेतला आहे. यामध्ये लॅबची साखळी जोडण्यात आली आहे. लॅबमध्ये तपासण्यात येणाऱ्या चाचण्यांचा अभ्यास केला जात आहे. डेल्टा प्लस हा डेल्टा व्हेरियंटचा भाग असल्याचे अजूनही निष्पन्न झालं नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

डेल्टा प्लसचा विषय हा काळजीचा नसला तरी याचे गुणधर्म राज्यासाठी चांगले नाही. या व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांना वेगळ्या वॉर्डमध्ये आयसोलेट करण्यात येत आहे. या रुग्णांची माहिती काढली जात आहे. कुठे फिरुन आलेत का, तसेच या रुग्णांनी कोरोना लस घेतलेली का याबाबतही पडताळणी करण्यात येत आहे. तसेच या रुग्णांची हाय रिस्क आणि लो रिस्क झोनमध्येही चाचण्या वाढवण्यात येत आहे. एकुणच डेल्टा प्लसबाबत अभ्यास सुरु आहे.

डेल्टा प्लसच्या व्हेरियंटमध्ये सुदैवाने अजून एकही मृत्यू झाला नाही. अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या संदर्भात राज्य शासनाच्या वतीने केंद्राच्या आरोग्यविभागाने माहिती मागितली आहे. ती माहिती मिळवून पाठवण्याची व्यवस्था राज्य सरकारद्वारे करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

First Published on: June 23, 2021 7:39 PM
Exit mobile version