म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचे दर आटोक्यात आणार, राजेश टोपेंची माहिती

म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शनचे दर आटोक्यात आणार, राजेश टोपेंची माहिती

राज्यात म्युकर मायकॉसिस आजाराने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्यावर मिळणाऱ्या इंजेक्शनच्या किंमतीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य नियामक संस्थेकडे पत्र पाठवण्यात आले आहे तसेच आजाराबाबत जनजागृती करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. म्युकर मायोकोसिसचा आजारामध्ये कान,नाक,घसा,डोळ्यांचा डॉक्टर रुग्णालयात उपस्थित असणे गरजेचे आहे. याबाबतही उपाययोजन करण्यात येत आहेत. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना असलेल्या रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

म्युकर मायकोसिसच्या आजाराचे रुग्ण बऱ्याच जिल्ह्यांत आढळत आहेत. पोस्ट कोविड किंवा कोविडचे उपचार सुरु असताना बुरशीजन्य आजार होत आहे. या संदर्भात जवळ जवळ अनेक जिल्ह्यांत रुग्ण आढळले आहेत. या संदर्भात तातडीने उपाययोजना करणे गरजेचे, यामध्ये सर्वच आवयवयांचे डॉक्टर उपस्थित असावे लागतात. कान,नाक,घसा,डोळ्यांवरचा डॉक्टर रुग्णालयात असावा लागतो. यामुळे या आजाराच्या कोणत्याही रुग्णालयात उपचार होणार नाही. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य रुग्णालयात या आजारावर उपचार करण्याची घोषणा केली आहे.

सध्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य रुग्णालय या आजारासाठी पात्र नाही परंतु यापुढे सर्व प्रयत्न करुन रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करण्यात येतील. १०० खासगी रुग्णालये उपलब्ध करण्यात येतील तसेच खासगी आणि शासकीय जे मेडिकल कॉलेजस आहे या दोन्ही कॉलेजसच्या अनुषंगाने उपचार करण्यात येईल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये म्युकर मायकोसिसचे महागडे औषध आहे. हे औषध जर त्यांच्या पॅकेजमध्ये बसत नसेल तर किंवा जास्त खर्च लागत असेल तर रुग्णालयला शासनाकडून मोफत पुरवू असा अहवाल आज येणार आहे. याबाबत निर्णय घेतला जाईल.

राज्य शासनाने एम्फो टेरेसीन बी नावाच्या औषधाची १ लाख कुप्यांची ऑर्डर राज्य सरकारने हाफकिनला दिली आहे. हाफकिन या संदर्भात ३ दिवसांत टेंडर काढून हे औषध उपलब्ध करुन देणार आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा उपाय केला आहे. हे इंजेक्शन २००० हजार रुपयाला होते ती आता ६००० रुपये झाली आहे. किंमत वाढवण्याच्या विषयावर मी स्वतः केमिकल फर्टीलाईझर मिनीस्टर आणि एनपीपीएला पत्र लिहून दर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. औषधाचे दर कमी करण्याचे काम कमी करावे लागेल जर रुग्ण संख्या वाढली तर सामान्य नागरिकांच्या अवाक्याबाहेर जाईल यासाठी दर कमी करावे लागणार आहेत. या आजाराबाबत मार्गदर्शक सुचना ज्या सर्वसामान्य नागरिकांना समजतील अशा सोप्या भाषेत म्युकर मायकोसिसच्या बाबतीत सांगाव्या लागतील. तसेच आजाराबाबत जनजागृती करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

First Published on: May 11, 2021 4:44 PM
Exit mobile version