राज्यात २,४४५ म्युकरमायकोसिस रुग्ण, प्रत्येक रुग्णाची पोर्टलवर नोंद होणार – राजेश टोपे

राज्यात २,४४५ म्युकरमायकोसिस रुग्ण, प्रत्येक रुग्णाची पोर्टलवर नोंद होणार – राजेश टोपे

राज्यातील दारू, वाईन शॉप बंद होणार का?, आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि म्यूकरमायकोसिसचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत म्युकरमायकोसिस रुग्णांवर मोफत उपचार तसेच या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उपाययोजना आणि निधीच्या उपलब्धतेबाबत चर्चा झाली. राज्यात एकुण २ हजार ४४५ म्युकरमायकोसिस रुग्ण आहेत तसेच रुग्णांची नोंद पोर्टलवर करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात किती रुग्ण आढळत आहेत याबाबत माहिती मिळत राहणार आहे. नोटेफायबल रुग्णांना या आजाराचा रिपोर्ट कळणार आहे. संबंधित रुग्णाच्या मोबाईलवर नोटिफिकेशनद्वारे रिपोर्ट कळवण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. या बैठकीला १८ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, कमिश्नर, एसपी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी होते. म्युकरमायकोसिस या आजाराला नोटेफायबल डीसिज म्हणून आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. यामध्ये ज्या रुग्णाची चाचणी करण्यात येणार आहे. अशा रुग्णांना नोटिफिकेशनद्वारे रिपोर्ट कळवला जाणार आहे. तसेच त्या रुग्णावर तात्काळ उपचार सुरु करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. रुग्णाला लागणाऱ्या एम्फोटेरेसीन-बी इंजेक्शनचा कंट्रोल राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने वाटप केल्यावर जिल्हाधिकारी या इंजेक्शनचा साठा स्विकारतील यानंतर जेवढी रुग्ण संख्या आहे त्या प्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.

म्युकरमायकोसिस आजारावरील उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत झाले पाहिजेत अशी सुचनाही देण्यात आली आहे. राज्य सरकारने उपचारासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सध्या राज्यातल प्रत्येक जिल्ह्यातील पकडून १३१ रुग्णालये म्यूकरमायकोसिस उपचार करण्यासाठी सज्ज ठेवली आहेत. या सर्व रुग्णालयात एम्फोटेरेसीन इंजेक्शन मोफत करण्यात आले आहे. राज्यात २ हजार ११३ म्युकरमायकोसिस रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये १७८० रुगणांवर उपचार सुरु आहेत. तर २१३ रुग्णांनी या रोगावर यशस्वी मात केली आहे. १२० रुग्णांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे.

खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांवर होणार उपचाराच्या दरात नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार कॅपिंग करणार आहे. नॉन कोविड संदर्भात न्यायालयात केस सुरु आहे. कोर्टामध्ये राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येणार आहे की, कोविडच्या अनुषंगाने रेट कॅपिंग केले तसेच म्युकरमायकोसिसच्या बाबतीत करण्याचा प्रयत्न आहे. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शनसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. यामध्ये ६० हजार इंजेक्शनसाठी हे टेंडर काढण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही.

म्युकरमायकोसिस पसरु नये यासाठी काळजी घेतली जाणरा आहे. या रोगाविषयी जनजागृती केली जणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईमध्ये जो निधी मिळाला आहे. त्याचा वापर म्युकरमायकोसिसच्या जनजागृती करण्यासाठी वापरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

First Published on: May 25, 2021 2:24 PM
Exit mobile version