राज्यात कोरोना नियंत्रणात येतोय, ग्लोबल टेंडरला ८ लस उत्पादक कंपन्यांचा प्रतिसाद – राजेश टोपे

राज्यात कोरोना नियंत्रणात येतोय, ग्लोबल टेंडरला ८ लस उत्पादक कंपन्यांचा प्रतिसाद – राजेश टोपे

राज्यातील दारू, वाईन शॉप बंद होणार का?, आरोग्यमंत्री टोपे म्हणतात...

महाराष्ट्राची कोरोना पॉझिटिव्हिटी हळू हळू १ अंकी होत आहे. सध्या राज्यातील कोरोना पॉढिटिव्हिटी रेट १० टक्के आहे. राज्यात कोरोना चाचणी प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. १०० पैकी १० चाचण्यांचा अहवाल सकारात्मक येत असल्याचे प्रमाणा आहे. राज्यात २ लाख ६१ हजारपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. कोरोनाचे प्रमाण जेवढे कमी होईल तेवढे आपल्यासाठी चांगले आहे. यामध्ये जमेची बाजू म्हणजे कोरोना लसीकरण आपण झपाट्याने लसीकरण करतो आहे. देशात लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर १ वर आहे. लस खरेदीसाठी राज्य सरकारने काढलेल्या ग्लोबल टेंडरला ८ राज्यांनी प्रतिसाद दिला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदिली आहे.

महाराष्ट्रामध्ये २ कोटी १३ लाख ५२ हजार ३४० लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी आणि कोरोनाच्या लसीचा साठा उपलब्ध करण्याठी राज्य सरकारकडून ग्लोबल टेंडर काढण्यात आले आहे. यामध्ये ३ महत्त्वाच्या कंपन्यांनी आणि ८ लस उत्पादित कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. फायझर, स्पुटनिक, अस्ट्राझेनेका, कोरोना वॅट, जॉनसनची लस आहे. या सगळ्या कंपन्यांनी दर आणि किती लसी देणार त्याबाबत सांगितले आहे.

२ दिवसांपुर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा पॉझिटिव्हिटीमध्ये जे वरचे जिल्हे आहेत. अशा जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला यामध्ये त्या जिल्ह्यांना काही सुचना देण्यात आलेल्या आहेत. होम आयसोलेशनवर भर न देता इन्स्टिट्यूशनल आयसोलेशनवर भर देण्यात यावा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच कोरोना चाचण्यांमध्ये फोकस टेस्टींग झाली पाहिजे जे हायरिस्क आणि लोरिस्कमधले जे लोक आहेत त्यांच्यामध्येच टेस्टींग झाली पाहिजे. सध्या प्रतिदशलक्ष चाचण्या २ लाख ६१ हजार ४६० अशी चाचण्यांची गती आहे. चाचण्या कमी न करता वाढवण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

होम आयसोलेशनबाबत नाराज होण्याचे कारण नाही

होम आयसोलेशनबाबत ग्रामीण भागातील लोकांना नाराज होण्याचे कारण नाही. इन्स्टिट्यूशनल क्वरांटाईन सेंटरमध्ये चांगली व्यवस्था ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्यायला शुद्ध पाणी, जेवणाची व्यवस्था, अंघोळ करण्यासाठी गरम पाणी, वॉक टेस्ट, आरोग्य तपासणी अशा सर्व गोष्टींची काळजी घेण्यात येणार आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखता येईल. जर एखाद्या व्यक्तीला जास्त त्रास झाल्यास त्यावर तात्काळ उपचार करता येईल. जास्तच आजारी झाल्यास त्याला कोविड रुग्णालयात दाखल करण्यात येईल यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आणी रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी होईल. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

First Published on: May 27, 2021 1:51 PM
Exit mobile version