जनक्षोभ : कत्तलखान्यांविरोधात संगमनेरमध्ये संतप्त नागरिकांचा मोर्चा

जनक्षोभ : कत्तलखान्यांविरोधात संगमनेरमध्ये संतप्त नागरिकांचा मोर्चा

संगमनेर – कत्तलखान्यांने बंद करावेत आणि या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करावं, या मागणीसाठी संगमनेरमधील विविध हिंदू संघटना, पक्ष आणि नागरिकांनी आज सकाळी एकत्र येत मोर्चा काढला होता. मोर्चेकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केलं. बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर पोलिसांनी केलेल्या व्यापक कारवाईनंतर स्थानिक पातळीवर हा जनक्षोभ उसळला आहे.

संगमनेरातील राजकीय पक्षभेद दूर सारत हिंदू बांधव एकत्र आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून संगमनेरच्या प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी जोपर्यंत संगमनेरातील अवैधरित्या चालणारे कत्तलखाने बंद करत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला.

मोर्चात पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष प्रा. सोपान देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, अमोल खताळ, कैलास वाकचौरे, आप्पासाहेब केसेकर, श्रीगोपाल पडताणी, भगवान गीते, अमर कतारी, घनश्याम जेधे, जयवंत पवार, शिरीष मुळे, सुदर्शन इटप, रोहित चौधरी, अमोल कवडे, अशोक सातपुते, मेघा भगत, कादंबरी बेल्हेकर आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोलिसांसह राजकीय वरदहस्त

बेकायदेशीर कत्तलखाने उद्धव्सत करा आणि त्यांना अभय देणाऱ्या नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आंदोलकांनी मोर्चादरम्यान केली. दोन दिवसांत अनधिकृत कत्तलखाने उध्वस्त झाले नाहीत तर संगमनेरमधील सर्व हिंदू आंदोलन अधिक तीव्र करून स्वतः कत्तलखाने उद्ध्वस्त करण्यासाठी पुढाकार घेतील, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

३२ हजार किलो गोमांस कारवाईत सापडले होते

संगमनेर शहरात जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व ठाणे भिवंडी येथील प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतिलाल जैन यांनी अहिंसेचा मंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी संगमनेर शहरात बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या ५ कत्तलखान्यांवर कारवाई करत तब्बल ३२ हजार किलो गोमांस आणि ७१ जनावरांची मुक्तता केली.

First Published on: October 4, 2021 4:38 PM
Exit mobile version