शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, रामदास आठवले म्हणतात उद्धव ठाकरेंची शक्ती कमी झाल्याने…

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, रामदास आठवले म्हणतात उद्धव ठाकरेंची शक्ती कमी झाल्याने…

Shivsena and VBA Alliance | सातारा – शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने काल युतीची घोषणा केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. त्यातच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही महत्त्वाची टीप्पणी केली आहे. शिवसेना आणि वबिआ एकत्र आल्याने शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले असं म्हणता येणार नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय अभ्यास शिबीर महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जात असताना रामदास आठवेलंनी वाई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – मोठी बातमी! ठाकरे गट आणि वंचितची युती; पक्षप्रमुखांकडून अधिकृत घोषणा

“उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन युतीचा राज्याच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे ते पर्याय शोधत आहेत आणि म्हणून त्यांनी वंचितशी युती केली आहे. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती महायुतीत भाजपसोबत एकत्र आले. त्यावेळी आम्ही भरपूर जागाही जिंकलेलो आहोत,” असं यावेळी रामदास आठवले म्हणाले.

येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा फडकेल, असंही आठवले यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश विकासाकडे वाटचाल करत असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्यासोबत असल्याचं आठवले म्हणाले.

युतीची घोषणा

“मला एका गोष्टीचा आनंद होत आहे की, ज्या स्वप्नाची वाट महाराष्ट्राची जनता याआधी पाहत होती. ते आता पूर्ण होत आहे. प्रकाश आंबेडकर आणि मी आज पहिल्यांदाच एकत्र एकाच व्यासपीठावर आहोत. तसेच, पुढची वाटचाल एकत्र लढण्यासाठी या वास्तूमध्ये आलो आहोत. ठाकरे आणि आंबेडकर या नावाला एक इतिहास व पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकांचे स्नेही होते. दोघांनी त्यावेळी समजातील वाईट परंपरेवर प्रहार केले. त्याच्याबद्दल आम्ही सांगण्याची काहीच आवशक्यता नाही”, असे काल युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

First Published on: January 24, 2023 11:48 AM
Exit mobile version