घरताज्या घडामोडीमोठी बातमी! ठाकरे गट आणि वंचितची युती; पक्षप्रमुखांकडून अधिकृत घोषणा

मोठी बातमी! ठाकरे गट आणि वंचितची युती; पक्षप्रमुखांकडून अधिकृत घोषणा

Subscribe

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली आहेत.

बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली आहेत. पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ही घोषणा केली आहे. (The Thackeray group and vanchit bahujan Aghadi Official announcement of alliance by party chief)

“आज २३ जानेवरी असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 97 वी जयंती आहे. मला एका गोष्टीचा आनंद होत आहे की, ज्या स्वप्नाची वाट महाराष्ट्राची जनता याआधी पाहत होती. ते आता पूर्ण होत आहे. प्रकाश आंबेडकर आणि मी आज पहिल्यांदाच एकत्र एकाच व्यासपीठावर आहोत. तसेच, पुढची वाटचाल एकत्र लढण्यासाठी या वास्तूमध्ये आलो आहोत. ठाकरे आणि आंबेडकर या नावाला एक इतिहास व पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकांचे स्नेही होते. दोघांनी त्यावेळी समजातील वाईट परंपरेवर प्रहार केले. त्याच्याबद्दल आम्ही सांगण्याची काहीच आवशक्यता नाही”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

- Advertisement -

“सध्या राजकारणात वाईट परंपरा आणि चाली चालल्या आहेत. त्याच्यावर आघात करून त्या मोडण्यासाठी त्या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि सहकारी एकत्र येत आहोत. देशप्रथम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. सध्या एक भ्रम पसरवला जातोय आणि नेहमी हुकमशाहीकडे अशीच वाटचाल होते. जनतेला भ्रमात ठेवायचे. नको त्या वादामध्ये अडकवून ठेवायचं आणि आपले इच्छित जे आहे, ते साध्य करून घ्यायचे. त्याच एका वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी, देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे महत्त्व आबाधित ठेवण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

ठाकरे गट आणि वंचितने का केली युती? 

देशाची राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात (25 नोव्हेंबर 1949 रोजी) देशाला उद्देशून इशारा दिला होता की, देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले. लोकशाहीस प्राधान्य दिले नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे, परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत, असं म्हणत वंचित आणि ठाकरे गटाने युतीमागचं कारण स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

पुढे राजकीय वाटचाल कशी असेल? आणखी पुढे काय करता येईल? या गोष्टीचा त्या-त्या वेळेला विचार करता येईल. तसेच, विचार विनिमय करून आम्ही पुढे जाऊच, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


हेही वाचा – साहेब! मला क्षमा करा; नारायण राणेंची लेखातून बाळासाहेबांना मानवंदना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -