गणपतरावांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार – रामदास आठवले

गणपतरावांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार – रामदास आठवले

गणपतरावांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार - रामदास आठवले

माजी आमदार गणपतराव देशमुख यांची अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी रिपल्बिकन पक्ष प्रयत्नांची पराकष्टा करणार करेल असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. रामदास आठवले यांनी गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आठवलेंनी श्रद्धांजली वाहिली. गणपतराव देशमुख चाणाक्ष, अभ्यासू तसेच सर्व क्षेत्रातील जाण असणारे नेते होते त्यांच्याबद्दल मला फार आदर होता अशी भावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माजी आमदार, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आठवले यांनी कुटुंबीयांची भेट घेत गणपतराव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधताना आठवलेंनी गणपतराव देशमुखांप्रति भावना व्यक्त केल्या तसेच गणपतरावांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिलं आहे.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गणपतराव देशमुख यांचे चिरंजीव चंद्रकांत देशमुख, नातू बाबासाहेब देशमुख, रतनकाकी देशमुख यांची भेट घेतली.

रामदास आठवले यांनी म्हटलं आहे की, गणपतराव देशमुख विधानसभेत जवळ जवळ ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी आणि पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा फार मोठा गौरव होता. गणपतरावांसोबत माझे वैयक्तिक संबंध होते. पंढरपूर लोकसभा निवडणूक १९९९ आणि २००४ साली माझ्यासाठी मोठे मताधिक्य मिळवून दिले आहेत. गणपतराव यांच्यामुळे पहिल्या वेळातच सव्वा लाख मताधिक्य तालुक्यातून मिळालं होते असे रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

अपूर्ण कामे पूर्ण करणार

गणपतराव देशमुख यांनी जनेच्या कामासाठी सातत्याने कार्यरत राहिले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये रिपल्बिकन पक्ष आणि केंद्रीय मंत्री या नात्याने अदरांजली वाहतो तसेच त्यांचे अपूर्ण राहिलेली कामे रिपल्बिकन पक्ष प्रयत्नांची पराकष्टा करेल असे आश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठावले यांनी दिलं आहे.


हेही वाचा :  पुनर्विकासानंतर तळीये गाव बनणार आदर्श गाव, म्हाडा ३० एकरवर बांधणार २६१ घरं


 

First Published on: August 18, 2021 4:09 PM
Exit mobile version