घरमहाराष्ट्रपुनर्विकासानंतर तळीये गाव बनणार आदर्श गाव, म्हाडा ३० एकरवर बांधणार २६१ घरं

पुनर्विकासानंतर तळीये गाव बनणार आदर्श गाव, म्हाडा ३० एकरवर बांधणार २६१ घरं

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार काल मंगळवारी मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्यातील धरणग्रस्त तळीये गावाच्या पुनर्वसनाबाबत (Redevelopment of Taliye village) एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. नवीन तळीये या गावाचे पुनर्वसन सुमारे तीस एकर जागेत करण्यात येणार असून यासाठी लागणारी जागा रायगडचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी निर्धारित केली आहे.

तळीये ग्रामस्थांना देखील ही जागा पसंत आहे. नियोजित नवीन तळीये गावामध्ये घरांच्या निर्मिती बरोबरच बालवाडी प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय यासारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती देखील म्हाडा मार्फत करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार नवीन तळीये मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर पॅनल या सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

- Advertisement -

कोकण पुरात उध्वस्त झालेल्या तळीये गावाच्या संदर्भात डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग बोलवण्यात आली होती. या बैठकीला रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव व सेंगुप्ता रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -