ठरलं तर…! रामदास आठवले लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार

ठरलं तर…! रामदास आठवले लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार

केंद्रात आणि राज्यात राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ साली शिर्डी मतदारसंघातून झालेल्या पराभवाची सल आठवलेंनी आज पुन्हा बोलून दाखवली आहे.

नगरला आल्यानंतर रामदास आठवले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्रीय मंत्रिपदाच्या माध्यमातून नगर आणि शिर्डी येथे मोठे औद्योगिक प्रकल्प आणण्यात येतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी २०२४ मध्ये लढण्यास इच्छुक आहे. पण यावेळेस लढणार आहे, पण पडणार नाही, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

शिर्डीतून लोकसभा लढविण्याची माझी इच्छा आहे. जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भाजप आणि शिंदे गटाची मागणी असेल, मी निवडून येण्याचे वातावरण असेल तर मी तेथून निवडणूक लढेल. भाजप आणि मित्रपक्षाने मला आग्रह केला तर मी निश्चित शिर्डीतून निवडणूक लढेल, असं रामदास आठवले म्हणाले.

आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदार संघात सहा महिन्यात तिसरा दौरा आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. लोखंडे हे भाजपकडून तीन वेळा कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून आमदार होते. परंतु शिवसेना फुटल्यावर ते शिंदे गटात गेले. त्यामुळे आता आठवले यांना शिर्डीतून निवडणूक लढायची असेल तर भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरणार आहे.


हेही वाचा : दहीहंडीच्या पंढरीकडे गोविंदा पथकांची पावलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उत्साह शिगेला


 

First Published on: August 18, 2022 10:09 PM
Exit mobile version