‘हे राजे आपल्यात नको’, रामराजेंनी कॉलर उडवत उदयनराजेंवर केली टीका

‘हे राजे आपल्यात नको’, रामराजेंनी कॉलर उडवत उदयनराजेंवर केली टीका

अन रामराजेंनी देखील उडवली कॉलर

‘दहा वर्ष शरद पवारांच्या मागे लागलो होतो की यांना आपल्या पक्षात ठेवू नका. हे गेले फार बरं झालं. आता काही झालं तरी यांना पुन्हा घेऊ नका.” अशी विनंती शरद पवारांना करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये कॉलर उडवली. उदयनराजे यांचे नाव न घेता फक्त कॉलर उडवून राजराजे यांनी उदयनराजेंवर टीका केली.

“हा जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या नावाने ओळखला जातो. दिल्लीत आम्ही जातो तेव्हा चव्हाण साहेबांच्या साताऱ्यातून आलो असे सागंतो. पण आज आम्ही कुणाचे नाव सांगणार? कुणाच्या मतदारसंघातून आले सांगणार. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ज्या थोर घराण्यात हे सदगृहस्थ जन्माला आले, त्या घराण्याला देखील काळे फासून हा माणूस आपल्यातून निघून गेला आहे.”, अशी टीका राजराजे यांनी केली.

हे वाचा – ..आणि भर पावसात शरद पवारांनी केलं भाषण!

आज सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. भरपावसात देखील कार्यकर्ते आणि नेते सभा पुर्ण करुनच उठले. शरद पवारांनी तर भर पावसात देखील आपले भाषण पुर्ण केले. पवार यांच्या आधी भाषण करत असताना रामराजे यांनी उदयनराजे यांच्यावर त्यांच्याच शैलीत टीका केली.

 

रामराजे आणि उदयनराजे यांच्यातून विस्तवही जात नाही, हे साताऱ्यासहीत संपुर्ण राज्याला माहीत आहे. शरद पवार यांनी अनेकदा दोन्ही राजेंमध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र त्यात त्यांना आणि पक्षाला कधीही यश आले नाही. उदयनराजे हे भाजपमध्ये जाण्यापुर्वी मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या एका बैठकीत दोन्ही राजे पवारांसमोरच एकमेकांना दुषण देत होते. त्यानंतर भडकलेल्या उदयनराजे यांनी मीडियासमोर येत आपला संताप व्यक्त केला होता.

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही उदयनराजे हे पक्षावर अधुनमधुन टीक करत होतेच. त्याआधी २००९ आणि २०१४ साली खासदार असतानाही त्यांनी राष्ट्रवादीला अनेकदा घरचा अहेर दिला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर पहिल्यांदाच रामराजे निंबाळकर यांनी जाहीर सभेतून त्यांच्यावर टीका केली आहे.

First Published on: October 18, 2019 9:50 PM
Exit mobile version