मोहित कंबोज यांचा रोख अजित पवारांवर नाहीच, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबाबत निंबाळकर म्हणाले…

मोहित कंबोज यांचा रोख अजित पवारांवर नाहीच, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याबाबत निंबाळकर म्हणाले…

सोलापूर – राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याची धक्कादायक माहिती भाजप नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा बडा नेता म्हणून अजित पवारांकडे रोख होता. मात्र, मोहित कंबोज यांचा रोख अजित पवारांकडे नसून राष्ट्रवादीच्या दुसऱ्याच नेत्यावर आहे, असा गौप्यस्फोट माढ्याचे भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. तसंच, लवकरच याबाबत खुलासा होईल, असंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर निशाणा साधला होता. भारतात आणि भारताबाहेरील संपत्ती, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंडच्या नावाने असलेल्या संपत्ती, वेगवेगळ्या मंत्रिपदावर असताना केलेले भ्रष्टाचार आणि कुटुंबीयांच्या नावाने असलेले संपत्ती याबाबत लवकरच खुलासा करणार असल्याचं ट्विट मोहीत कंबोज यांनी केलं आहे. तसेच, या प्रकरणी राष्ट्रवादीचा बडा नेता अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाणार असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला होता. त्यामुळे सगळ्यांचा रोख अजित पवारांकडे होता. मात्र, अजित पवारांवर मोहित कंबोज यांचा निशाणा नसून राष्ट्रवादीच्या दुसऱ्याच नेत्यावर निशाणा असल्याचं निंबाळकर म्हणाले.

First Published on: August 20, 2022 10:50 AM
Exit mobile version