Amravati Riots: अमरावती हिंसाचारात रझा अकादमीसह भाजपा, युवासेनेचाही समावेश? पोलिसांचा गृह विभागाला अहवाल

Amravati Riots: अमरावती हिंसाचारात रझा अकादमीसह भाजपा, युवासेनेचाही समावेश? पोलिसांचा गृह विभागाला अहवाल

Amravati Riots : अमरावती हिंसाचारात रझा अकादमीसह भाजपा, युवासेनेचाही हात? महाराष्ट्र पोलिसांकडून तपास सुरु

अमरावतीत झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह अनेक राजकीय पक्षांचाही हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. दरम्यान एबीपी वृत्तवाहिनीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, अमरावती हिंसाचारात रझा अकादमीबरोबरचं भाजप आणि युवा सेनेच्याही लोकांचाही हात होता. यामुळे केवळ काही मुस्लिम संघटनांनाकडूनच नाही तर राजकीय पक्षांनीही अमरावतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग केला होता, असा अहवाल पोलिसांकडून गृहविभागाला सादर करण्यात आला आहे. नुकताच अमरावती पोलिसांनी हा अहवाल गृहखात्याकडे सुपूर्द केला आहे. दरम्यान या दंगली भडकवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

त्रिपुरातील घटनेचे पडसाद हे महाराष्ट्रात उमटतानाच अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसाचाराप्रकरणी आत्तापर्यंत भाजपच्या आमदारांसह अनेक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र काही जणांना त्यानंतर जामीनावर सोडून देण्यात आले. तर रझा अकादमी आणि काही मुस्लीम संघटनांविरोधातही कारवाई सुरु आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे दंगल घडवण्यापूर्वी सोशल मीडियावर तेढ निर्माण करणाऱ्या ६० ते ७० पोस्ट टाकल्या आल्या होत्या. यातील एका पोस्टमध्ये त्रिपुरामध्ये अनेक मशिदी पाडण्यात आल्याची माहिती होती. या सर्व पोस्ट सोशल मीडियावर हजोरांच्या संख्येने फॉरवर्ड करण्यात आल्या होत्या. अधिकाधिक लोक या दंगलीत सहभागी होती असा या पोस्ट मागचा उद्देश होता. दरम्यान २९ ऑक्टोबरपासून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय)ने जिल्हा दंडाधिकारी अमरावती कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले. या घटनेनंतर १ नोव्हेंबर रोजी जय संविधान संघटनेच्या काही लोकांनीही जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निषेध आंदोलन केले.

यानंतर ६ नोव्हेंबरला सरताजचे तीन मिनिटांचे एका ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे त्रिपुरातील अनेक मशिदी पाडण्यात आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली. १२ नोव्हेंबरला रझा अकादमीने या निषेधार्थ अमरावती बंदचे आयोजन केल्याची माहिती सोशल मीडियावर पसरली. अमरावतीमध्ये रझा अकादमी, एमआयएम आर्मी तसेच जमात अहले सुन्नाने मोर्चा काढला. यावेळी काही लोकांनी तोडफोड करत हिंसाचार घडवून आणला. याप्रकरणी अमरावतीत आतापर्यंत १० गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांच्या अहवालात काय ?

दरम्यान १३ नोव्हेंबरला रझा अकादमीने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी अमरावतमधील भाजपा, युवा सेना आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी देखील मोठ्याप्रमाणात हिंसाचार उफाळून आला. या मोर्चात भाजप, बजरंग दल आणि युवासेनेचे लोक सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपने प्रत्यक्षात सोशल मीडियावर यासाठी एक मोहीम सुरू केली होती. अशी माहिती देखील पोलिसांच्या हाती लागली आहे.

एमआयएम आर्मी, रझा अकादमी वेलफेअर सोसायटी अमरावती आणि जमात अहले सुन्ना अमरावतील लोकांनी माथी भडकावण्यास जबाबदार असल्याची काही माहिती तपास यंत्रणांना मिळाली, ज्याची चौकशी आत्ता पोलिसांकडून सुरू आहे. रझा अकादमीचे बॅनरही पोलिसांना मिळाले आहेत. तसेच भाजपा, युवा सेना आणि बजरंग दलाचाही या हिंसाचारात सहभाग असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. याच संदर्भातील अहवाल आता गृहमंत्र्यालयाकडे सूपुर्द करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु आहे.


 

First Published on: November 17, 2021 1:40 PM
Exit mobile version