मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत विक्रमी वाढ; 2022-23 मध्ये 81.88 दशलक्ष टन मालवाहतूक

मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत विक्रमी वाढ; 2022-23 मध्ये 81.88 दशलक्ष टन मालवाहतूक

central railway

मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत विक्रमी वाढ झाली आहे.  2022-23 मध्ये ८१.८८ दशलक्ष टन मालवाहतूक मध्य रेल्वेवर झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ७६.१६ दशलक्ष टन लोडिंगच्या तुलनेत ७.५% वाढीसह २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेची ८१.८८ दशलक्ष टन मालाची झालेली लोडिंग, मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची सर्वोत्तम लोडिंग आहे. मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये केवळ लोडिंगचे उद्दिष्टच साध्य केले नाही तर ते २.४% ने ओलांडले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ पेक्षा ५.७२ दशलक्ष टन वाढीव लोडिंग नोंदवले गेले आहे. 3 एप्रिलला मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. यात ही माहिती देण्यात आली आहे.

(Record growth in Central Railway freight 81.88 million tones of cargo in 2022-23 )

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ८४३८.८३ कोटींचा मूळ महसूल नोंदवला, जो आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत १५.१ % वाढला आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षापेक्षा ११०८.६ कोटींची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये, NTKM चे लोडिंग (जे एक किमीवर वाहून नेले जाणारे एक टन पेलोड आहे) १३.९% ने वाढले आणि शिशाचे लोडिंग गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६% ने वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ५२४ रेकच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ९४.७% ची विक्रमी वाढ नोंदवून ऑटोमोबाईल्सचे १०२० रेक लोड करण्यात आले.

( हेही वाचा: यूपी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मुघलांचा विषय बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय )

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मध्य रेल्वेच्या एकूण लोडिंग आकडेवारीमध्ये लोह खनिजाच्या लोडिंगमध्ये १.६९ दशलक्ष टन वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये लोह आणि स्टीलमध्ये ५४.१%, कांद्यामध्ये ३२.५%, पेट्रोलियम उत्पादनांमध्ये २१.१%, कंटेनरमध्ये १६.४%, अन्नधान्यांमध्ये ५.७% खतामध्ये ५% आणि सिमेंटमध्ये ४% ने लोडिंगमध्ये वाढ झाली आहे. मध्य रेल्वेने मार्च-२०२२ मधील ७.६२ दशलक्ष टनांच्या तुलनेत मार्च-२०२३ महिन्यात ८.७० दशलक्ष टन इतके मासिक लोडिंग देखील नोंदवले आहे.

First Published on: April 3, 2023 8:02 PM
Exit mobile version