घरदेश-विदेशयूपी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मुघलांचा विषय बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

यूपी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मुघलांचा विषय बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

यूपीचे विद्यार्थी आता मुघलांच्या इतिहासाचा अभ्यास करणार नाहीत. योगी सरकारने १२वीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत.

यूपीचे विद्यार्थी आता मुघलांच्या इतिहासाचा अभ्यास करणार नाहीत. योगी सरकारने १२वीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. यूपीमध्ये १२ वीच्या वर्गात शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे. याशिवाय इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींचा संघर्ष आणि औद्योगिक क्रांतीचे धडेही काढून टाकण्यात आले आहेत. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापासून हा बदल लागू करण्यात आला आहे. यासोबतच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्धाचा धडाही काढून टाकण्यात आला आहे.

शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये इंटरमिजिएटमध्ये शिकवल्या जाणार्‍या इतिहासाच्या पुस्तकात ‘भारतीय इतिहास के कुछ विषय द्वितीय मधून शासक आणि मुघल दरबार काढण्यात आला आहे. योगी सरकारने यूपी बोर्डाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. इयत्ता १२ वी आणि ११ वीच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. इस्लामचा उदय, संस्कृतींच्या संघर्षाचा अध्याय ११ वीपासून काढून टाकण्यात आला आहे आणि औद्योगिक क्रांतीचे धडेही काढून टाकण्यात आले आहेत. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापासून हा बदल लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

तसंच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्धाचा धडा काढून टाकण्यात आला आहे. ‘स्वतंत्र भारतातील राजकारण’ या पुस्तकात जनआंदोलनांचा उदय आणि एकपक्षीय वर्चस्वाचा काळ हे विषय काढून टाकण्यात आले आहेत.

या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपली संस्कृत ही आपली सांस्कृतिक वारसा आहे. आपल्या नव्या पिढीला वारसाची ओळख करून द्यायची आहे. जुन्या काळी लोकांना आपल्या संस्कृतीपासून वंचित ठेवले जात होते, लोकांना सांगितले जात नव्हते. आता आम्ही लोकांना खरी संस्कृती सांगू, असं उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी सांगितले.

- Advertisement -

यापूर्वीही २०२० मध्ये असाच निर्णय घेतला होता
मुघलांचे नाव आणि इतिहासाबाबत योगी सरकारने यापूर्वी सुद्धा निर्णय घेतले आहेत. २०२० मध्ये योगी सरकारने आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय केले. त्यानंतर योगींनी ट्विट करून म्हटले होते की, ‘आग्रामध्ये निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखले जाईल. तुमच्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या प्रतिकांना स्थान नाही. आमचे हिरो शिवाजी महाराज आहेत. जय हिंद जय भारत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -