कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना या आठवड्यात मिळणार घरं

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना या आठवड्यात मिळणार घरं

टाटा मेमोरियल रुग्णालय हे कँन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नावाजलेले रुग्णालय आहे. या रुग्णालयात महाराष्ट्रातूनच नाव्हे तर संपुर्ण भारतातून कँन्सरग्रस्त उपचार घेण्यासाठी येत असतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही असतात. या नातेवाईकांची राहण्याची सोय नसल्याने आणि त्यांना खासगी निवासस्थान परवडत नसल्याने मुंबईतील फुटपाथवर राहावे लागते. तर आता या रुग्णांच्या नातेवाईकांना म्हाडाकडून घरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याच आठवड्यात ही घरे देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर कँन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरे देणार असल्याचे सांगितले आहे. आव्हाड यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला… कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला. मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत. अशा आशयाचे ट्विच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

त्यामुळे आता या आठवड्यातच टाटा मेमोरियल कँन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना घरे मिळणार आहेत. ३०० चौरस फुट असलेले १०० फ्लॅट टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे श्री.आव्हाड यांनी सांगितले. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच कारारनामा करण्यात येणार आहे.

चाव्या शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार 

म्हाडाच्या या घरांच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हाँस्पिटलला सोपवण्यात येतील. पुढील काही दिवसात यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. चाव्या शरद पवारांच्या हस्ते चाव्या टाटाकडे सोपवण्यात येणार आहे. त्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

नावं बदलायची काय ही हौस

हरियाणा राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हरियाणा सरकारने राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आला तेव्हा भाजपकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. परंतु आता भाजपशासित राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून या लॉकडाऊनचे नाव महामारी सुरक्षा अलर्ट हरियाणा असे नाव देण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादी नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हरियाणाच्या लॉकाडाऊनवर सवाल उपस्थित केला आहे. नाव बदली केल्याने काय फरक पडणार? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नावं बदलायची काय ही हौस; लॉकडाऊनला हरियाणात “महामारी सुरक्षा अलर्ट हरियाणा” असं नवं नामाभिधान प्राप्त झालंय. त्याने काय फरक पडणार? अशा आशयाचे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

First Published on: May 10, 2021 3:45 PM
Exit mobile version