धक्कादायक! Covid-19 रूग्णांना पार्सलमधून खर्रा आणि मद्य पुरवण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न

धक्कादायक! Covid-19 रूग्णांना पार्सलमधून खर्रा आणि मद्य पुरवण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न

Covid-19 रूग्णांना पार्सलमधून खर्रा तर मद्य पुरवण्याचा नातेवाईकांचा प्रयत्न

राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असून कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयात बेडची कमतरता भासताना दिसतेय. तर प्रत्येक कोरोना रुग्णाचा नातेवाईक आपला व्यक्ती लवकरात लवकर कसा बरा होईल यासाठी चिंतेत आहे. मात्र यवतमाळमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविडच्या उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना त्यांच्याच नातेवाईकांकडून खर्रा आणि मद्य पुरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार वैद्यकीय महाविद्यालयात तैनात असलेले सुरक्षारक्षकासह डॉक्टर यांच्या सतर्कतेने उघडकीस आला असल्याची माहिती मिळतेय.

असा घडला प्रकार

व्यसनाधिन कोरोना बाधित रुग्णांची तल्लफ भागवण्यासाठी बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी अनोखी युक्ती लढवल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी टरबुज मधून खर्रा पार्सल पाठवण्याचा प्रयत्न केला. तर काही नातेवाईकांनी रुग्णांना मद्य पुरवण्याचा देखील प्रयत्न केला. हा सगळा प्रकार करताना कोणला शंका येऊ नये म्हणून रूग्णाला मद्य पुरवताना ते घरचं जेवण वाटावं म्हणून अॅल्युमिनियमच्या पेपरमध्ये पॅकिंग करून पार्सल दिले. मात्र तेथे हजर असलेल्या स्टाफला शंका आल्याने त्यांनी हे पार्सल उघडून पाहिले असता त्यात दारूच्या बाटल्या असल्याचे दिसले.

डॉक्टर-सुरक्षारक्षकांच्या सहाय्याने प्रकार उघड

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रूग्णांना उपचारासाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यावरील काही दिवसांच्या उपचारांनंतर कोरोनाच्या धोक्यातून ते बाहेर पडले. मात्र त्यानंतर त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याच ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांनी खर्रा तसंच मद्य पाठवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांच्या सहाय्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


धक्कादायक! मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन कोरोनाबाधित महिलेसोबत विनयभंगाचा प्रयत्न

 

First Published on: April 15, 2021 12:17 PM
Exit mobile version