घरमुंबईधक्कादायक! मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन कोरोनाबाधित महिलेसोबत विनयभंगाचा प्रयत्न

धक्कादायक! मुंबईत हॉटेलमध्ये क्वारंटाईन कोरोनाबाधित महिलेसोबत विनयभंगाचा प्रयत्न

Subscribe

मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असताना दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांमध्ये देखील तेवढीच वाढ होत आहे. दरम्यान, मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये कोरोनाची लागण झालेल्या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी मुंबईतील अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात घडल्याची माहिती मिळतेय. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. या ३७ वर्षीय आरोपीचे नाव सरफराज मोहम्मद अकबर खान असून तो व्यवसायाने मेडिकल कोऑर्डिनेटर होता. कल्याणमधील रहीम पॅलेस अपार्टमेंटमध्ये तो वास्तव्यास होता.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या कामोठे परिसरात ही महिला तिच्या परिवारासह राहत असून गेल्या आठवड्यात महिलेसह सर्व घरातील सदस्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. ७ एप्रिलपासून घरातील सर्वांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या महिलेचा पती बँकेत नोकरी करतो. सर्वांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अंधेरीच्या विट्स हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. यादरम्यान या महिलेच्या नवऱ्यासह सासूला अधिक त्रास जाणवू लागल्याने पनवेल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले. यावेळी या क्वारंटाईन सेंटरमध्ये ही महिला आणि तिचा मुलगाच होते. गेल्या २ दिवसांपूर्वी महिला डिस्चार्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. यावेळी ती घरातही क्वारंटाईन राहू शकते असेही सांगितले. हॉटेलमध्ये उपस्थित एका महिलेने तिला सरफराजचा नंबर देऊन त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. जेव्हा महिलेने त्याला संपर्क केला तेव्हा हॉटेलमध्ये येऊन सविस्तर बोलू असे सांगून तुम्हाला डिस्चार्ज देऊ शकत नाही, यासाठी आपल्याला डीएमची परवानगी घ्यावी लागेल असं सांगून तो तिथून निघून गेला.

- Advertisement -

काही वेळाने सरफराज पुन्हा त्या महिलेल्या रूमकडे आला. यावेळी महिलेने मी कोरोनाबधित असून तू रूमबाहेर थांब अशी विनंती केली. त्याने काहीही न ऐकता मी तुला डिस्चार्ज मिळवून देईल त्या बदल्यात तू मला काय देशील असे म्हणून त्याने तिच्याशी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यासह त्याने महिलेकडे शरीर सुखाची मागणीही केली. महिलेने याचा विरोध स्वत:ची सुटका केली आणि पळ काढला.

महिलेने या घटनेची माहिती पती आणि पोलीस कंट्रोल रुमला दिली. फोन आल्यानंतर तातडीने एमआयडीएस पोलीसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झाली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी अटक केली आणि न्यायालयाने आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली आहे.

- Advertisement -

 

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -