मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री पुरवणार महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री पुरवणार महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

रिलायन्स इंडस्ट्री पुरवणार महाराष्ट्राला १०० मॅट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने अनेक रुग्णालात ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. राज्यातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता भारतातील प्रसिद्ध उद्योगसमूह रिलायन्स मदतीसाठी पुढे आला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ऑक्सिजन ची वाढती मागणी लक्षात घेत रिलायन्स कंपनीला वाढीव ऑक्सिजन देण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता गुजरामधील रिलायन्सच्या जामनगर प्लांटमधून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा दिला जाणार आहे.़

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढतेय. त्यामुळे कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याचीही गरज वाढत आहे. त्यामुळे मागणी मोठ्याप्रमाणात असतानाही पुरवठा मात्र कमी प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवतेया. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य राजेश टोपे यांच्याकडूनही ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याची कबुली देण्यात आली होती.

त्यामुळे आता रिलायन्सच्या जामनगर प्लांटमधून महाराष्ट्राला १०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा सुरु झाल्यास ऑक्सिजनची चणचण काही प्रमाणात दुर होणार आहे. दरम्यान राज्याचे माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिलायन्स इंडस्ट्री महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवण्यात करणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान इतरही उद्योगसमूहांकडून राज्याला ऑक्सिजन पुरवठा कसा उपलब्ध करता येईल यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे.


हेही वाचा- ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा २५ एप्रिलपासून छोटेखानी भारत दौरा


 

First Published on: April 16, 2021 8:54 AM
Exit mobile version