घरदेश-विदेशब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा २५ एप्रिलपासून छोटेखानी भारत दौरा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांचा २५ एप्रिलपासून छोटेखानी भारत दौरा

Subscribe

२०१९ निवडणूक जिंकल्यानंतर जॉन्सन यांचा भारतात येण्याचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन २५ एप्रिल २०२१ रोजी छोटेखानी भारत दौरा करणार आहेत. २०१९ निवडणूक जिंकल्यानंतर जॉन्सन यांचा भारतात येण्याचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. परंतु देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे या दौऱ्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. जॉन्सन २५ एप्रिल भारतात दाख होताच त्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

जॉन्सन २६ एप्रिल रोजी भारतात येत असून याच दिवशी त्यांच्या सर्व महत्वाच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. भारत आणि ब्रिटेन संरक्षण आणि सुरक्षेसह विस्तृत क्षेत्रांसाठी “रोडमॅप २०30०”वर सकारात्मक चर्चा होईल. अशी माहिती लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या प्रवक्त्यांनी दिली

- Advertisement -

दरम्यान जॉन्सन यांच्या हा भारत दौरा नेमका किती दिवस असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु कोरोनाचे संकटात पाहता हा दौरा थोडक्यात आटपणार असून यातील बहुतेक कार्यक्रम दिल्लीत होणार आहेत. यापूर्वी जॉन्सन २६ जानेवारी २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार होते परंतु युकेमध्ये कोरोनाचा संक्रमण वाढत असल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला. यानंतप बोरीस यांनी लवकरचं भारत भेटीवर येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार हा दौरा आयोजित केला गेला आहे.

या दौऱ्यात जॉन्सन यांनी दिल्ली शिवाय मुंबई, पुणे, बंगलोर आणि चेन्नईला भेट देण्याचे ठरविले होते. पण भारतात कोरोना परिस्थिती भयावह बनत असल्याने जॉन्सन यांची भेट दिल्ली पुरती मर्यादित केली गेली आहे. या वर्षात होत असलेल्या जी ७ परिषदेचे यजमानपद ब्रिटनकडे असून या समिटसाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आमंत्रण दिले गेले आहे

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -