मनिषा म्हैसकर यांची बदली

मनिषा म्हैसकर यांची बदली

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या अनेक सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचा धडाका गुरुवारीही कायम राहिला. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची बदली राजशिष्टाचार प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विजय सूर्यवंशी यांची बदली झाली आहे. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी जयश्री भोज यांची बदली करण्यात आली आहे. यांच्यासह नऊ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून मीरा-भाईंदरच्या आयुक्तपदी सी. के. डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सनदीअधिकार्‍यांच्या बदल्यांचा सपाटा सुरु झाला आहे. गुरुवारी एकूण नऊ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या.

गुरुवारी एकूण नऊ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांना मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव एम.डी. पाठक यांची नियुक्ती प्रधान सचिव नगर विकास-२ या पदावर केली असून शिर्डी येथील साईबाबा विश्वस्त संस्थेतील मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम. मुगळीकर यांना परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पद देण्यात आले आहे. व्ही.एन. सूर्यवंशी यांची बदली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

पुणे येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची बदली पुणे येथील पशु संवर्धन विभागाच्या आयुक्तपदी तर मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागातील सहसचिव सी.के. डांगे यांना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त एम. देवेन्द्र सिंह यांची बदली यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदावर करण्यात आली आहे. तर परभणीचे जिल्हाधिकारी सिवा शंकर यांना नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून पाठविण्यात आले आहे.

First Published on: February 14, 2020 6:43 AM
Exit mobile version