दहावी, बारावी फेरपरीक्षेचा २३ डिसेंबरला निकाल

दहावी, बारावी फेरपरीक्षेचा २३ डिसेंबरला निकाल

प्रातिनिधीक फोटो

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल २३ डिसेंबरला दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकालाची प्रिंटदेखील विद्यार्थ्यांना काढता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर दुसर्‍या दिवसांपासून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना लगेचच गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पूर्नमूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://verification.mh-ssc.ac.in या तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करावा लागणार आहे. गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना २ जानेवारीपर्यंत तर छायाप्रतीसाठी १२ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

First Published on: December 22, 2020 6:48 PM
Exit mobile version