महसुली दस्तावेजांची सुरक्षा वाऱ्यावर!

महसुली दस्तावेजांची सुरक्षा वाऱ्यावर!

फोटो प्रातिनिधीक आहे

तहसील रेकॉर्ड रुममध्ये अज्ञातांचा वावर वाढला

श्रीगोंदा तालुक्यातील तहसील कार्यालयाचे महसुली दस्तावेज संग्रहित करून ठेवण्यासाठी रेकॉर्ड रूम आहे. मात्र त्या रेकार्ड रूममध्ये खासगी लोकांचा वावर वाढला असून येथील दस्तावेजांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दस्तावेजांत खाडाखोड केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

अज्ञातांचा वावर वाढला 

श्रीगोंदा तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचे सर्व जुने महसुली पुरावे या ठिकाणी आहेत. त्यामध्ये सातबारे फेरफार, जन्म-मृत्यूच्या नोंदीचे पुरावे इत्यादींचा समावेश आहे. जतन करण्यासाठी ते रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात येतात, सन १९१८ पासूनचे दस्तावेज या ठिकाणी उपलब्ध आहेत. मात्र, अलिकडच्या काळात या रेकॉर्ड रूममध्ये अनेक खासगी लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. तसेच येथील काही दस्तावेजांमध्ये खाडाखोड करण्यात आल्या आहेत. त्यातून काहींच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, तर काही जन्म मृत्यूच्या नोंदीतही बदल झालेला आहे.

चौकशीची मागणी

तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूममधून खासगी लोकांचा वावर कमी करून झालेल्या गैर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत महसूल प्रशासनाने याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

First Published on: May 24, 2018 7:24 AM
Exit mobile version