पुणे-सोलापूर महामार्गावर दरोडेखोरांची लूट, 3 कोटी 60 लाखांचा माल लंपास

पुणे-सोलापूर महामार्गावर दरोडेखोरांची लूट, 3 कोटी 60 लाखांचा माल लंपास

पुणे-सोलापूर महामार्गावर दरोडेखोरांनी तब्बल 3 कोटी 60 लाखांचा माल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान घडली. दरोडेखोरांनी पहिल्यांदा पीडितांचा पाठलाग केला आणि त्यानंतर गोळीबार करत 3 कोटी 60 लाखांचा माल लंपास केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश कुमार पटेल हे पुणे-सोलापूर महामार्गावरून स्कॉर्पिओमधून जात होते. दरम्यान, स्पीड ब्रेकर आल्याने वाहनाचा वेग कमी होताच चार अज्ञातांनी लोखंडी हत्यार घेऊन गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार वाहकाने तेथून भरधाव वेगाने कार पुण्याच्या दिशेने नेली. परंतु अज्ञातांनी मारुती स्विफ्ट कार आणि टाटा कंपनीच्या कारमधून त्यांचा पाठलाग केला.

भावेश कुमार पटेल यांनी कार थांबवली नाही, तेव्हा त्यांचा पाठलाग करणाऱ्या दोन दुचाकीस्वार दरोडेखोरांनी पटेल यांच्या कारवर गोळीबार केला. त्यानंतर या दरोडेखोरांनी त्यांची कार रस्त्यातच थांबवून भावेश कुमार आणि विजयभाई यांच्या कारमध्ये बसवल्यानंतर त्यांना मारहाण केली. तसेच त्यांचे गाडीमधील पैसे सुद्धा लंपास केले.

दरम्यान, एवढी मोठी रक्कम गाडीत आलीच कशी?, असा मोठा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या पैशांचा हवाला रॅकेटशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांना आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.


हेही वाचा : चलो दापोली रिसॉर्ट तोडो! अनिल परबांच्या कथित रिसॉर्टप्रकरणी सोमय्यांचा दापोली दौरा


 

First Published on: August 27, 2022 12:00 PM
Exit mobile version