राज ठाकरेंनी ‘नवीन स्टाईल’मध्ये उत्तरं दिली, रोहित पवारांनी केलं कौतुक

राज ठाकरेंनी ‘नवीन स्टाईल’मध्ये उत्तरं दिली, रोहित पवारांनी केलं कौतुक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘लोकमत’ पुरस्कार सोहळ्यात मुलाखत झाली. ही मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतली. यावेळी या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी जुन्ने किस्से सांगत दिलखुलासपणे आणि रोखठोक अशी सर्व प्रश्नांची उत्तर दिली. मात्र, या मुलाखतीत त्यांनी आपल्या मूळ स्टाईलपेक्षा नवीन स्टाईलमध्ये उत्तर दिली. त्यामुळे त्यांची ही मुलाखत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

राज ठाकरेंच्या या नव्या स्टाईलचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत कौतुक केलं आहे. तसेच त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांची देखील प्रशंसा केली आहे. अमोल कोल्हे यांच्यातील नेता आणि अभिनेता सर्वांनाच माहिती आहे, मात्र काल एका उत्तम पत्रकाराचंही दर्शन घडलं. त्यांनी विचारलेले सडेतोड प्रश्न आवडले. तसेच राज ठाकरेंनीही काही प्रश्नांची उत्तरं आपल्या मूळ स्टाईलमध्ये दिली. पण काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी नवीन स्टाईलमध्ये दिली, असं रोहित पवार म्हणाले.

डॉ. अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी राजकारणासंबंधीत अनेक प्रश्न राज ठाकरेंना विचारले. त्यावर राज ठाकरेंनी मनमोकळेपणाने प्रतिक्रिया देत कोपरखळ्या सुद्धा मारल्या. या मुलाखतीत राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना एका वाक्यात काही सल्ला द्यायला सांगितला. त्यावरही राज ठाकरेंनी सल्ला दिला.

हेही वाचा : राज ठाकरे हे राजकारणातील असे व्यक्तीमत्त्व आहे, ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी राज्यभरातील लोक येत असतात. 

एकनाथ शिंदे यांना जपून राहा, देवेंद्र फडणवीस यांना वरती संबंध नीट ठेवा, अजित पवार यांना बाहेर जेवढं लक्ष देत आहात तितकं काकांकडे पण द्या, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंना काय सल्ला द्याल? त्यावर, राज ठाकरे म्हणाले की, त्यांना काय सांगणार ते स्वयंभू आहेत. आदित्य ठाकरे हे पण स्वयंभू आहेत, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी ठाकरेंवर केली.


हेही वाचा : रावसाहेब दानवेंची फटकेबाजी; म्हणाले, मोदींनी कोविडच्या सहा महिनेआधीच सुरु केली होती तयारी


 

First Published on: April 27, 2023 4:06 PM
Exit mobile version