घरताज्या घडामोडीरावसाहेब दानवेंची फटकेबाजी; म्हणाले, मोदींनी कोविडच्या सहा महिनेआधीच सुरु केली होती तयारी

रावसाहेब दानवेंची फटकेबाजी; म्हणाले, मोदींनी कोविडच्या सहा महिनेआधीच सुरु केली होती तयारी

Subscribe

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना आपल्या खास शैलीत फटकेबाजी केली आहे. कोविड येण्याच्या सहा महिने आधीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तयारी केली होती, असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला.

कोविड येण्याआधीच मोदींनी सहा महिने तयारी केली होती. जी लस नव्हती ती तयार केली आणि जगाला पोहोचवली. देशातही मोफत लस दिली. पाकिस्तानात २५० रुपये किलो गव्हाचं पीठ आहे. मात्र भारतात मोदी गहू फुकट देत आहेत. ट्रान्सफार्मरसाठी केंद्र सरकारने ८०० कोटी दिले. आता कितीही आकडे टाका फरक पडणार नाही, असं दानवे म्हणाले.

- Advertisement -

सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४नंतर पीक विम्याचे नियम बदलले. तेव्हापासून शेतकरी विमा भरायला लागले. शेतकऱ्यांना विमाही मिळू लागला. उद्धव ठाकरे हातवर करून शेतकऱ्यांवर बोलतात. यांना शेती माहीत आहे का? उद्धव ठाकरे यांना विचारा बटाटे जमिनी खाली येतात की वर? हरभऱ्याचे घाटे कुठे येतात? असं म्हणत हल्ला रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणायचे. पण यांनी अडीच वर्षे काय केलं?, तर घरातच बसून राहिले. युतीच्या वेळी मी, चंद्राकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होतो. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची बंददाराआड चर्चा झाली. त्यानंतर दोघेही अर्ध्या तासात बाहेर आले. त्यानंतर युतीचा निर्णय झाला. भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्टेजवरून जाहीर केलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंची दातखिळी बसली होती का? असा सवाल उपस्थित करत दानवेंनी ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा : Dantewada Attack : जवानांचे बलिदान सदैव स्मरणात राहील; पंतप्रधानांकडून श्रद्धांजली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -