घोषणा ७५ हजारांची पण प्रत्यक्षात भरती केवळ साडेसहा हजार पदांचीच…! रोहित पवारांचे ट्वीट

घोषणा ७५ हजारांची पण प्रत्यक्षात भरती केवळ साडेसहा हजार पदांचीच…! रोहित पवारांचे ट्वीट

राज्यात ७५ हजार पदं भरण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. परंतु विविध विभागांच्या मागणीनुसार, पदसंख्या १ लाख ४५ हजारांवर गेली आहे. त्यामधील ६ हजार ४९९ पदं आतापर्यंत भरण्यात आली असून उर्वरित पदांसाठी भरतीची तयारी सुरू आहे. दरम्यान, राज्यात ७५ हजार पदभरती करण्याची घोषणा सरकारने केली असून आतापर्यंत केवळ साडेसहा हजार पदंच भरली आहेत, असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

रोहित पवारांचं ट्वीट काय?

राज्यात ७५ हजार पदभरती करण्याची घोषणा सरकारने केली असून आतापर्यंत केवळ साडेसहा हजार पदंच भरली आहेत. तर दुसरीकडं मविआ सरकारने दिलेल्या आदेशानुसार विविध विभागांमध्ये तब्बल २ लाखाहून अधिक पदं रिक्त असल्याची आकडेवारी पुढं आली आणि त्यापैकी १.४५ लाख पदं भरण्याची मागणी या विभागांनी केलीय, असं रोहित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदभरतीचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी विविध विभागांकडून पदांबाबत माहिती देण्यात आली होती. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदं रिक्त आहेत. ही रिक्त पदं भरावीत, अशी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी संघटनांची मागणी आहे. परंतु ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार पदं भरण्याचे ठरविण्यात आले आहे.


हेही वाचा :सल्ला घ्यायला गेले असतील, अदानी-पवारांच्या भेटीवर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया


 

First Published on: April 20, 2023 4:11 PM
Exit mobile version