अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके-भाजपकडून मुरजी पटेलांनी भरला उमेदवारी अर्ज

अंधेरी पोटनिवडणूक: ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके-भाजपकडून मुरजी पटेलांनी भरला उमेदवारी अर्ज

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोठं शक्तीप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना नेत्यांसह काँग्रेस – राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांनीही हजेरी लावली होती. दरम्यान मुरजी पटेल यांनी मोठ्या रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले आहे. मुरजी पटेल यांच्या शक्तीप्रदर्शनात भाजपचे अनेक प्रमुख नेतेही सहभागी झाले होते.

14 ऑक्टोबर म्हणजे आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 17 ऑक्टोबरपर्यंच आहे. मतदान 3 नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मात्र या निवडणुकीमुळे शिंदे गट- भाजप आणि उद्धव ठाकरे गटात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.

ऋतुजा लटके यांच्या नोकरीच्या राजीनाम्यावरून बराच राजकीय संघर्ष पाहायला मिळाला, यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप झाला. दोन्ही गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने अंधेरी पोटनिवडणुकीसाठी मशालविरुद्ध ढाल तलवार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामनात कोण बाजी मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं लक्ष लागून आहे.


मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनाच हवं होतं, भुजबळांविषयी केलेल्या विधानाचा गिरीश महाजनांनी घेतला समाचार

 

First Published on: October 14, 2022 4:27 PM
Exit mobile version