भाजपला वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही, सचिन सावंत यांची टीका

भाजपला वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही, सचिन सावंत यांची टीका

महावसूली बोंब ठोकणारा भाजपच वसूलीबाज, सचिन सावंत यांचा हल्लाबोल

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे राज्य सरकारने मोजक्याचा मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना आषाढी वारीची परवानगी दिली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाला असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र तेवढाच तीव्र आहे. विरोधी पक्ष भाजपने वारकऱ्यांच्या पायी वारीचा आग्रह धरला असून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अमरनाथची यात्रा रद्द करण्यात आली आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवरच चांगलाच हल्लाबोल केला आहे. भाजपचं हीन पातळीचं राजकारण सुरु आहे. भाजपला वारकऱ्यांच्या जीवाशी काही घेणंदेणं नाही अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे. अमरनाथ यात्रा रद्द करणारी भाजपा पंढरपूरच्या वारीसाठी आग्रह धरत आहे. दुटप्पीपणा तो हा! धारकऱ्यांच्या पाठिराख्या भाजपाला वारीशी व वारकऱ्यांच्या जीवाशी घेणंदेणं नाही. फक्त हीन पातळीचे राजकारण करायचे आहे. हिंमत असेल तर मोदींविरुद्ध बोला. कुठे गेले ते अध्यात्मिक आघाडीचे थोतांड? अशा आशयाचे ट्विट सचिन सावंत यांनी केलं आहे.

पंढरपुरमध्ये संचारबंदी

पंढरपूरात होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कलम १४४च्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी लागू करण्यात येणार आहे. १७ जुलै ते २५ जुलै या काळात पंढरपूरात कलम १४४ लागू राहणार आहे. परवानगी नसलेल्या भाविकाला सोलापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. २० जुलै रोजी यंदाची आषाढी एकादशी आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही भाविकांना पंढरपूर यात्रेला जाता येणार नाहीये.

First Published on: June 22, 2021 4:25 PM
Exit mobile version