मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला ॲलर्जी – सचिन सावंत

मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला ॲलर्जी – सचिन सावंत

मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला ॲलर्जी - सचिन सावंत

युजीसी अभ्यासक्रमातील इतिहास विषयात भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा इतिहास वगळण्यात आला आहे. या बदलांबाबत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला ॲलर्जी आहे. काँग्रेसने देश घडवला, सहिष्णू वैज्ञानिक दृष्टिकोन दिला.भाजप देशाचा चेहरा बिघडवत आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली. (Sachin Sawant Slam Modi Govt on changes in history subject in UGC curriculum)

इतिहासाला धार्मिक व जातीयवादी दृष्टिकोनातून पाहणारे मोदी सरकार भारताचे कधीही न भरून येणारे नुकसान करत आहेत. शिक्षण क्षेत्राचे संघ विचारधारेतून राजकीय फायद्यासाठी विकृतीकरण नव्या पिढीला घातक आहे.
त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ ची इंग्रजांविरुध्दचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवे ही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला
इतिहास हा धर्म, जाती, चांगल्या वाईटाचा नसतो. ती मानवीय प्रवासातील घटनांची नोंद असते. भारताचा प्रवास अभ्यासाचा विषय असावा. मुघल किंवा इतर परकीय शासक हे अत्याचारीच होते हे दाखवून विशिष्ट समाजाप्रती द्वेष निर्माण होऊन राजकीय फायदा घेणें हा मोदी सरकारचा उद्देश आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

पुढे सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांचा २१ व्या शतकातील वैज्ञानिक व प्रगतीशील दृष्टिकोन तयार व्हावा व राष्ट्रीय एकता मजबूत व्हावी हा उद्देश नाही. मानवता, करुणा व सद्भावना हे मनुष्याचे गुण आहेत. भगवद्गीतेमध्ये षड्रिपूंचा त्याग हे जीवन ध्येय दर्शवले आहे. द्वेष, तिरस्काराने समाजाची प्रगती साधू शकत नाही अत्याचाराचीच नोंद घ्यायची असेल तर मनुवादातून बहुजनांवर झालेले हजारो वर्षांचे अत्याचार सर्वात भयानक म्हणावे लागतील. एकलव्य, शंभूकापासून सुरु करुन बौद्ध स्तूप तोडली त्यामागील मानसिकता ही अभ्यासावी लागेल. संघाचा मनुवाद, ब्रिटिशांशी संगनमत व देशविरोधी कारवायाही अभ्यासाव्या लागतील.


हेही वाचा - दुकानदार, हॉटेल चालकांना दिलासा देण्याबाबत सरकार सकारात्मक, अस्लम शेख यांची माहिती

 

First Published on: July 15, 2021 5:43 PM
Exit mobile version